Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मनसेच्या इंजिनाची शिट्टी आता शिंदे-फडणवीस सरकारविरोधात!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
raj thackeray, pramod patil, eknath shinde, devendra

मुक्तपीठ टीम

मशिदींवरील भोंग्यातून अजानविरोधी मोहिमेतून हिंदुत्वासाठी अतिआक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेची भाजपाशी युती होणार असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या. पुढे काहींनी संविधानाच्या १०व्या परिशिष्टातील बंधनामुळे दुसऱ्या पक्षात विलिनीकरणाच्या अटीची पुर्तता करण्यासाठी शिंदे गटाचे आमदार मनसेत जातील की काय, अशाही बातम्या आल्या. पण तसं काही अद्याप झालं नाही. आता मात्र, मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवरून थेट शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे आता मनसेच्या इंजिनाने या सरकारविरोधात शिट्टी वाजवण्यास सुरुवात केल्याचं मानलं जातं.

आमदार राजू पाटील यांचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्ला

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्वीटरवर आपला संताप व्यक्त केला आहे.
“बंड झाले, आता थंड झाले?
पालिकेत नगरसेवक नाहीत,
जिल्ह्याला पालकमंत्री नाही,
राज्याला मंत्री नाहीत,
मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालंय,
सर्वकाही ठप्प आहे.
तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे सण आलेत.
रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी, रोगराई वाढत आहे. याकडे कोण बघेल?”

 

बंड झाले,आता थंड झाले ?

पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्हाला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत,मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालंय,सर्वकाही ठप्प आहे.

तुमचं सर्व ओक्के आहे हो,पण लोकांचे सण आलेत.रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी,रोगराई वाढत आहे.याकडे कोण बघेल ?@mieknathshinde

— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) August 8, 2022

दोघांचं मंत्रिमंडळ, एक आमदार आणि टीका!

  • प्रमोद (राजू) रतन पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार आहेत.
  • २०१९मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर ते मनसेचे विधानसभेतील एकमेव आमदार आहेत.
  • त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यात लांबलेल्या निवडणुका, राज्यात दोन जणांचे मंत्रिमंडळ चालवणाऱ्या शिंदे – फडणीवस सरकारचे धोरण यावर टीका केली आहे.
  • शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडखोरीनंतर ठाकरे सरकार कोसळलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्या युतीचं सरकार सत्तेत आलं.
  • आता जवळपास सव्वा महिना झाल्यानंतरही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.
  • त्यामुळे दोघांचे सरकार, दुचाकी सरकार अशी टीका सुरु आहे.
  • मंत्री नसल्याने सरकारचे कामकाज नोकरशाहीच्या माध्यमातून चालत आहे.
  • त्यातच मंत्री नसल्याने जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री नाहीत.
  • नव्या सरकारने मनपा, नपा, नप आणि इतर निवडणुका लांबवल्याने आता नगरसेवही नाहीत.
  • त्यामुळे लोकांची कामे रखडत आहेत.
  • त्याच मुद्द्यावर आमदार पाटील यांनी या मुद्द्यावर शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
  • मनसेकडून प्रथमच अशी थेट टीका झाल्याने भाजपाविरोधी मतांमध्ये वााटा मिळवण्यासाठी मनसे वेगळ्या भूंमिकेत जाण्याच्या विचारात आहे की भाजपाला अस्तित्वाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न आहे, अशी चर्चा सुरु आहे.

Tags: mnsRaju PatilShinde Fadnavis Govtआमदार राजू पाटीलमनसेशिंदे-फडणवीस सरकार
Previous Post

महाराष्ट्राचा कारभार सचिवांकडून नव्हे लोकप्रतिनिधींकडून चालला पाहिजे! : अतुल लोंढे

Next Post

ईडीनं पीएमएलए कायद्याखाली अटक केल्यावर जामीन मिळवणं सोपं का नसतं? जाणून घ्या तरतुदी…

Next Post
ED And SC

ईडीनं पीएमएलए कायद्याखाली अटक केल्यावर जामीन मिळवणं सोपं का नसतं? जाणून घ्या तरतुदी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!