Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तटरक्षक दलाच्या पथकात Mk-III हेलिकॉप्टर्स, हवाई सामर्थ्यात वाढ

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
GNM (4)

मुक्तपीठ टीम

तटरक्षक दलाच्या पथकात आता एम के थ्री हेलिकॉप्टर्स सामील करण्यात आली आहेत.. त्यामुळे समुद्रातील रक्षकाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तटरक्षक दल म्हणजेच कोस्ट गार्डच्या हवाई सामर्थ्यात वाढ झालीय. या स्वदेशी अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सची रचना आणि निर्मिती हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), बंगळुरू यांनी केली आहे.

mk-3 (2)
सध्याच्या कठीण काळात तटरक्षक दलाने ‘मेक इन इंडिया’चे पंतप्रधानांचे स्वप्न पुढे नेले आहे. या हेलिकॉप्टर्सचा ताफ्यात समावेश केल्याबद्दल भारतीय तटरक्षक दल आणि हिंदुस्तान एॅरोनॉटिक्स लिमिटेडच्या चिकाटीचे डॉ. अजय कुमार यांनी कौतुक केले. तटरक्षक दलाच्या व्यापक मोहिमांदरम्यान या प्रगत हेलिकॉप्टर्सच्या वापराचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. बंगळुरू इथे कोविड प्रोटोकॉल लक्षात ठेवून आणि सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ संकल्पनेला प्रोत्साहन देत हा कार्यक्रम पार पडला ज्यात दिल्लीहून डिजिटल पद्धतीने मान्यवर सहभागी झाले होते.

mk-3 (1)

तटरक्षक दलाच्या गडांनुसार हेलिकॉप्टरमध्ये बदल

  • तटरक्षक दलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एचएएलने 19 अतिरिक्त उपकरणांच्या मदतीने ALH Mk-III सागरी वापरासाठीच्या मॉडेलची रचना विकसित केली आहे.
  • एचएएल पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत तटरक्षक दलाला 16 ALH Mk-II पुरवणार आहे.
  • ही हेलिकॉप्टर्स जहाजांवरून परिचालन करण्यास सक्षम आहेत.
  • सागरी-हवाई समन्वयासह शोध, प्रतिबंध क्षमता, तटीय सुरक्षा, शोध आणि बचाव कार्ये, वैद्यकीय स्थलांतरण, मानवतावादी मोहिमा, प्रदूषण निवारण अभियानाच्या दिशेने तटरक्षक दलाची क्षमता वाढेल.

 

तौते आणि यास चक्रीवादळांदरम्यान अनेकांचे प्राण वाचवल्याबद्दल तसेच अलिकडेच अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रे जप्त केल्याबद्दल आयसीजीचे कौतुक करत संरक्षण सचिव म्हणाले की, आयसीजीकडे सरकारने दिलेल्या कठीण जबाबदाऱ्या विचारात घेऊन कालबद्ध रीतीने सेवा क्षमता वाढवणे आवश्यक आहे.
ताफ्यात समावेश झाल्यानंतर 16 एएलएच एमके -III हेलिकॉप्टर्स भुवनेश्वर, पोरबंदर, कोची आणि चेन्नई येथे चार तटरक्षक दलाच्या ताफ्यात नियुक्त केले जातील.

 

किनारपट्टी लगतच्या राज्यांसह सामायिक सागरी सीमावर अनेकदा बेकायदेशीर व्यवहार चालतात तसेच या भागात वारंवार चक्रीवादळ होण्याची शक्यता असते. तटरक्षक दलाचा हा काफिला त्यावर अखंड देखरेख ठेवेल आणि समुद्रात संकटात सापडलेल्या मच्छिमारांना मदत पुरवेल .

 

तटरक्षक दलाचे महासंचालक के. नटराजन यांनी तटरक्षक दलाच्या अलिकडच्या प्रयत्नांची प्रशंसा करताना सांगितले की भारतीय तटरक्षक दल आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सज्ज आहे आणि ALH Mk-III च्या समावेशामुळे जहाजावरुन मोहिमा बजावता येतील आणि देखरेख ठेवणे शक्य होईल. ही हेलिकॉप्टर्स सेवा क्षमता बळकट करण्यासाठी जहाज आणि विमानासमवेत समन्वयासह तैनात केली जातील असे त्यांनी स्पष्ट केले.
एचएएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन आणि संरक्षण मंत्रालयाचे अन्य वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: ALH Mk-IIIHindustan Aeronautics Limitedindian coast guardएचएएलएम के थ्री हेलिकॉप्टर्सडॉ. अजय कुमारतटरक्षक दलमेक इन-इंडियाहिंदुस्तान एॅरोनॉटिक्स लिमिटेड
Previous Post

अंतराळ पर्यटनाची वेडी क्रेझ, एका सीटसाठी ७५०० तयार, २०५ कोटींचे तिकिट!

Next Post

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये १२१ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
GNM (5)

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये १२१ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!