Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

१०हजार धावा करणारी मिताली राज पहिली महिला क्रिकेटर

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
mitali raj

मुक्तपीठ टीम

 

भारतीय महिला क्रिकेटची दिग्गज खेळाडू आणि कर्णधार मिताली राजने आता तिच्या क्रिकेटच्या कारकीर्दीतील मोठे यश संपादन केले आहे. मिताली राज जवळपास २० वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा एक भाग आहे आणि सध्या ती वन डे संघाची कर्णधार आहे. दक्षिण आफ्रिकेसमवेत सुरू असलेल्या वन डे मालिकेत मिताली राजने तिच्या १० हजार धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच महिला क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करणारी मिताली राज ही भारतातील पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे.

 

याआधी महिला क्रिकेटमध्ये इंग्लंडची माजी कर्णधार शार्लोट एडवर्ड्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या. शार्लोटने १३ शतके आणि ६७ अर्धशतकांच्या मदतीने १० हजार २७३ धावा केल्या होत्या.

 

लखनौमध्ये खेळल्या जाणार्‍या वन डे मालिकेच्या तिसर्‍या सामन्यात भारतीय कर्णधार मिताली राजने ही मोठी कामगिरी केली आहे. तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात मिताली राजने ५० चेंडूत ३६ धावा केल्या आणि पॅव्हेलियनमध्ये परतली. मात्र, या खेळीतून तिने आपल्या १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.

 

मितालीच्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल

मिताली राजने तिच्या कारकीर्दीत १० कसोटी सामने खेळले असून यात तिने ५१.०० च्या सरासरीने ६६३ धावा केल्या असून एक शतकी व चार अर्धशतके झळकावल्या आहेत. टी -२० क्रिकेटमध्ये मिताली राजने ८९ सामने खेळले असून त्यामध्ये तिने ३७.५२ सरसरीने २३६४ धावा केल्या, त्यात १६ अर्धशतकेही ठोकले आहेत. मितालीने वनडे क्रिकेटमध्ये २१२ सामन्यात ६९७४ धावा केल्या आहेत.

तिने २००२ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तिने वनडेमध्ये पहिला सामना १९९९ साली खेळला होता. तसेच २००६ मध्ये तिने टी-२० मध्ये पदार्पण केले होते.


Tags: 000 runs10Mithali Rajwoman cricketerकर्णधार मिताली राजभारतीय महिला क्रिकेटमिताली राज
Previous Post

बॉलिवूडच्या लखलखाटातही जग्गूदादामधील माणूस जिवंत

Next Post

रेल्वेच्या कोणत्याही कामासाठी एकच हेल्पलाइन क्रमांक १३९

Next Post
helpline

रेल्वेच्या कोणत्याही कामासाठी एकच हेल्पलाइन क्रमांक १३९

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!