मुक्तपीठ टीम
मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकांसाठी सर्व राजकारणी एकाच मंचावर दिसले. यावेळी एमसीएचा नवा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुक्ता सर्वांना होतीच, परंतु राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे राजकारणी क्रिकेटच्या मैदानात एकत्र आल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यावेळीच सर्वांना मोठा धक्का बसला होता तो म्हणले शिवसेनेचे सचिव असलेले मिलिंद नार्वेकर हे पवार-शेलार गटात असल्याचा. मिलिंद नार्वेकर निवडणुकीत उपस्थित असल्याने त्यांच्यासाठी ठाकरे कुटुंबिय येतील अशी आशा होती. मात्र ठाकरेंनी निवडणुकीत अनुपस्थिती लावली, असं असताना देखील नार्वेकर विजयी ठरले. त्यानंतर आता ठाकरे कुटुंबियांशिवाय मिलिंद नार्वेकर यांचे काहीही अडत नसल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
मिलिंद नार्वेकर विजयी!!
- शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार चर्चेत आले आहेत.
- मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीसाठी सर्व पक्षीय नेते उपस्थित होते.
- मिलिंद नार्वेकर हे शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या गटामधून निवडणूकीसाठी उभे होते.
- या गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा होता.
- उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे तिघेही मुंबई क्रिकेट संघटनेचे सदस्य आहेत.
- पण या तिघांपैकी एकानेही मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीला उपस्थिती लावली नाही.
- पण जरी ठाकरे कुटुंबियांनी मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीला दांडी मारली असली तरी मिलिंद नार्वेकर विजयी ठरले.
मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी ठाकरे कुटुंबिय का आले नाही?
- ही निवडणूक राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठेचा विषय बनवला होता.
- कारण तब्बल तीनवेळा मुख्यमंत्री निवडणुकीच्या प्रचारासाठी उपस्थित राहिले होते.
- मिलिंद नार्वेकर हे निवडणूकीसाठी उपस्थित होते, त्यामुळे त्यांना मतदान करायला हे तिघेही येतील, असे वाटत होते.
- पण यावेळी तिघांपैकी एकही ठाकरे एमसीएच्या निवडणूकीसाठी आलेच नाही.
- त्यामुळे मुंबई क्रिकेट संघटनेच्या वर्तुळात मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी ठाकरे कुटुंबिय का आले नाहीत, याचीच चर्चा सर्वात जास्त रंगलेली पाहायला मिळाली.