Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

SC-ST आरक्षण वाढीनंतर कर्नाटकाने ५०टक्के मर्यादा ओलांडली!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Karnataka Govt

मुक्तपीठ टीम

कर्नाटक मंत्रिमंडळाने एका महत्त्वपूर्ण निर्णयाला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाने अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणात वाढ केली आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, अनुसूचित जातीचे आरक्षण १५ टक्क्यांवरून १७ टक्के आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण ३ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या अध्यादेशाला मान्यता देण्यात आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे.

कर्नाटकात आरक्षणाची मर्यादा ५६ टक्के!!

  • हे लक्षात घेण्यासारखे आहे की, यापूर्वी कर्नाटक सरकारने ८ ऑक्टोबर रोजी एससी/एसटी कोटा वाढवण्यास औपचारिक मान्यता दिली होती.
  • सरकारच्या या निर्णयानंतर कर्नाटकात आरक्षणाची मर्यादा ५६ टक्के होणार आहे.
  • उल्लेखनीय आहे की इंदिरा साहनी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ५० टक्के निश्चित केली होती.
  • आता कर्नाटक मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर ही मर्यादा ५० टक्क्यांच्या वर जाणार आहे.

सरकार कोटा वाढवण्याची शिफारस करणार:

  • कर्नाटकमध्ये आरक्षणाची मर्यादा ५६ टक्के झाली आहे.
  • अशा स्थितीत राज्य सरकार येत्या काही दिवसांत त्याला कायदेशीर संरक्षण देण्यासाठी राज्यघटनेच्या ९व्या अनुसूचीनुसार कोटा वाढवण्याची शिफारस करणार आहे.
  • कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री जे. सी. मधुस्वामी यांनी म्हटले आहे की, ‘एससी/एसटी आरक्षण वाढवण्याच्या निर्णयानंतर आम्ही मंत्रिमंडळासमोर एक विधेयक सादर केले आणि ते अध्यादेश जारी करण्यासाठी राज्यपालांकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय-

  • कर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपानं मोठा निर्णय घेतला आहे.
  • मंत्री जे. सी. मधुस्वामी म्हणाले की, सरकारने यापूर्वी कोटा वाढवण्यासाठी कार्यकारी आदेश जारी करण्याचा निर्णय घेतला होता.
  • आम्हाला आधी वाटले होते की कार्यकारिणीचा निर्णय पुरेसा ठरेल, पण नंतर वाटले की कोर्टात प्रश्न पडल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात, म्हणून आम्ही निर्णय घेतला.
  • अध्यादेशाने निर्णय घेतला आहे.
  • मधुस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकमध्ये एससी प्रवर्गात पहिल्यांदा ६ जाती होत्या आता त्यांची संख्या १०३ पर्यंत पोहोचली आहे.
  • त्यामुळं या प्रवर्गातील नागरिकांची संख्या वाढली आहे.
  • तर, दुसरीकडे एसटी प्रवर्गात देखील नव्यानं काही जातींचा समावेश करण्यात आला आहे.
  • त्यामुळं त्या प्रवर्गाची टक्केवारी ७ टक्क्यांपर्यंत नेण्यात आली आहे.

Tags: karnatakaSC-ST ReservationSC-ST आरक्षणकर्नाटककर्नाटक सरकार
Previous Post

मिलिंद नार्वेकर उमेदवार, तरीही ठाकरे मतदानापासून दूरच!

Next Post

ग्रामीण उद्योजकांच्या वस्तूंना मोठी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली प्रदर्शनाला भेट

Next Post
Minister Uday Samant visited the exhibition of rural entrepreneurs

ग्रामीण उद्योजकांच्या वस्तूंना मोठी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली प्रदर्शनाला भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!