Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवी मुंबईत लवकरच मेट्रो धावणार, २८ ऑगस्टपासून ऑसिलेशन चाचणी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
metro

मुक्तपीठ टीम

सिडको महामंडळाच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. एकवर मेट्रोची ऑसिलेशन चाचणी घेण्यात येणार आहे. रिसर्च डिझाईन ॲन्ड स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन म्हणजेच आरएसडीओकडून २८ ऑगस्ट २०२१ पासून ही चाचणी घेण्यात येईल. पेंधर स्थानक ते सेंट्रल पार्क स्थानकादरम्यान मेट्रोची ऑसिलेशन चाचणी आणि इमर्जन्सी ब्रेक डिस्टन्स चाचणी घेण्यात येणार आहे. या मार्गावर प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीकोनातून ऑसिलेशन चाचणी महत्त्वाची ठरणार आहे. या चाचण्यांमुळे मेट्रोचा मार्ग मोकळा होणार आहे.

 

ऑसिलेशन चाचणी हा महत्त्वाचा टप्पा – डॉ. संजय मुखर्जी

  • प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्यापूर्वीचा ऑसिलेशन चाचणी हा महत्त्वाचा टप्पा आहे.
  • ऑसिलेशन चाचणी पार पडल्यानंतर लवकरच मार्ग क्र. १ वर दोन टप्प्यांत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.
  • यामुळे नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

 

नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी मेट्रो

  • नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या आणि नवी मुंबईतील नोड परस्परांना अधिक सुलभरीत्या जोडले जावेत या उद्देशाने सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण ४ उन्नत मार्ग (एलिव्हेटेड कॉरिडॉर) विकसित करण्यात येत आहेत.
  • यांपैकी ११.१० कि.मी. लांबीच्या, तळोजा येथे आगार (डेपो) असलेल्या मार्ग क्र. १ वर मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.
  • या मार्गावरील उर्वरित कामे पूर्ण करण्याकरिता सिडकोकडून महामेट्रोची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मुख्य व्हायडक्ट, आगार प्रवेश व्हायडक्ट, आगार व कार्यशाळा उभारणीची कामे पूर्ण झाली आहेत.
  • तर स्थानकांची उभारणी, लिफ्ट, उद्ववाहन, फर्निचर आणि प्रणाली ही कामे प्रगतीपथावर आहेत.

 

भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयांतर्गत असणाऱ्या आरएसडीओवर देशातील विविध रेल्वे प्रणालींमध्ये प्रमाणीकरण आणि समन्वय साधण्याची जबाबदारी असते. आरएसडीओकडून सदर मार्ग क्र. १ वरील पेंधर स्थानक ते सेंट्रल पार्क स्थानका दरम्यानच्या ५.१४ कि.मी. च्या अंतरावर मेट्रोची ऑसिलेशन चाचणी आणि इमर्जन्सी ब्रेक डिस्टन्स चाचणी २८ ऑगस्ट २०२१ पासून घेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी म्हणून ऑसिलेशन चाचणी अत्यंत महत्त्वाची ठरते. ऑसिलेशन चाचणी पार पडल्यानंतर लवकरच मार्ग क्र. १ वर पहिल्या टप्प्यात स्थानक क्र. ७ ते ११ आणि दुसऱ्या टप्प्यात स्थानक क्र. १ ते ११ दरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: CIDCOIndian RailwayMetronavi mumbaiRSDOआरएसडीओडॉ. संजय मुखर्जीनवी मुंबईप्रत्यक्ष प्रवासी वाहतूकमेट्रोरेल्वे मंत्रालय
Previous Post

रेल्वे आता विमानानं काश्मिरात नेणार, अगदी स्वस्तात सहा दिवस फिरा!

Next Post

कोरोनानंतरही विद्यापीठांना ऑनलाइन शिकवण्याची परवानगी

Next Post
UGC

कोरोनानंतरही विद्यापीठांना ऑनलाइन शिकवण्याची परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!