Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रेल्वे आता विमानानं काश्मिरात नेणार, अगदी स्वस्तात सहा दिवस फिरा!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
kashmir

मुक्तपीठ टीम

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्यांना नेहमी काश्मीरच्या सुंदर निसर्गात दोन क्षण मजेत घालवायचे आहेत, पण रोजच्या धकाधकीत ते जमलेलं नाही, अशांसाठी ही चांगली बातमी आहे. आता भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीने काश्मीर पर्यटनाचं खास पॅकेज जाहीर केलंय. मुंबई ते श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम पर्यंत पाच रात्री आणि सहा दिवसांचे विशेष टूर पॅकेज आहे. सर्वप्रथम, प्रवाशांना इंडिगो विमानाने मुंबईहून श्रीनगरला नेले जाईल. टूर पॅकेजची सुरुवातीची किंमत २७ हजार ३०० रुपये ठेवण्यात आली आहे.

 

मुंबईहून हा दौरा २५ किंवा २६ सप्टेंबर रोजी सुरू होईल. हा दौरा इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅंड टूरिझम कॉर्पोरेशनने आयोजित केला आहे. सर्वप्रथम, प्रवाशांना इंडिगो विमानाने मुंबईहून श्रीनगरला नेले जाईल. हवाई तिकिटे, हॉटेलची राहण्याची सोय, नाश्ता आणि रात्रीचे जेवण, प्रवास, प्रवासादरम्यान आयआरसीटीसी टूर एस्कॉर्ट सेवा, प्रवास विमा, टोल पार्किंग आणि कर हा सर्व विशेष पॅकेजचा भाग आहे. तसेच, पर्यटन केंद्रांवर दुपारचे जेवण आणि प्रवेश तिकिटांसाठी पैसे द्यावे लागतील.

 

मुंबई ते काश्मीरपर्यंतचा प्रवास

  • मुंबईहून ते श्रीनगरला पोहचल्यानंतर हाऊसबोटवर चेक-इन करू शकता. दुपारी तलावाकडे तसेच सुंदर टेकड्यांवर फिरता येईल.
  • आपल्या खर्चाने शिकारा राइडचा आनंदही घेता येईल.
  • श्रीनगरमध्ये रात्रभर मुक्कामाची सोय आहे. तिथे रात्रीच्या जेवणाची सोयही आहे.
  • दुसऱ्या दिवशी नाश्त्यानंतर, पहलगामच्या दिशेने प्रवास सुरू होईल. तेथे बेताब व्हॅली, अवंतीपुरा अवशेष, चंदनवाडी आणि अरु व्हॅलीची सुंदर ठिकाणे आहेत.
  • पहलगामला पोहोचल्यानंतर स्वखर्चाने टट्टू राईड किंवा स्थानिक वाहन भाड्याने घ्यावे लागेल.
  • तिसऱ्या दिवशी बर्फाच्छादित गुलमर्ग दऱ्यातून प्रवास सुरू होईल.
  • दिवसभराच्या प्रेक्षणीय स्थळांच्या दर्शनानंतर, श्रीनगरला परत नेले जाईल. रात्रीच्या जेवणाची सोयही तिथेच केली जाईल.
  • चौथ्या दिवशी सोनमर्गला जाण्यासाठी प्रवास सुरू होईल. येथील पर्यटन स्थळे फिरून झाल्यानंतर, श्रीनगरला पुन्हा नेले जाईल.
  • शेवटच्या पाचव्या दिवशी श्रीनगरच्या लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी नेण्लयात येईल. ज्यात मुगल गार्डन, निशांत बाग, शालीमार गार्डन, हजरतबाल आणि बरेच काही समाविष्ट आहे. संध्याकाळी तुम्ही खरेदीसाठी देखील जाऊ शकता.
  • सहाव्या दिवशी मुंबईला परतण्यासाठी फ्लाइट संध्याकाळी ५:३० वाजता असेल. या फ्लाइटद्वारे तुम्ही थेट मुंबईला परत येऊ शकाल.

 

या योजनेमुळे आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार काश्मीरला भेट देण्याची योजना आखू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: injammu kashmir toursmumbaiआयआरसीटीसीइंडिगोइंडियन रेल्वे कॅटरिंग अॅंड टूरिझम कॉर्पोरेशनटूर पॅकेजभारतीय रेल्वेमुंबई
Previous Post

राज्यात ४,३५५ नवे रुग्ण, ४,२४० रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post

नवी मुंबईत लवकरच मेट्रो धावणार, २८ ऑगस्टपासून ऑसिलेशन चाचणी

Next Post
metro

नवी मुंबईत लवकरच मेट्रो धावणार, २८ ऑगस्टपासून ऑसिलेशन चाचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!