Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी न्यूज चॅनल्सचं या आठवड्याचं रेटिंग काय सांगतं? रेटिंग बंदी मागणीचं सावट असलेल्या झी २४ तासच्या रेटिंगचं पाऊल कुठे?

September 6, 2026
in सरळस्पष्ट
0
TV rating 07-04-22

तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम

झी २४ ताससह झीच्या ९ प्रादेशिक न्यूज चॅनल्सच्या रेटिंग रिपोर्टिंगवर प्रसारभारतीने बंदीची मागणी केल्यानंतर पहिले रेटिंग आज जाहीर झाले आहे. अद्याप बार्कनं माहिती प्रसारण खात्याकडून काही कळवलं नसल्याचं सांगत प्रसारभारतीची मागणी मान्य केली नसल्याने या आठवड्याच्या मराठी चॅनल्सच्या रेटिंगमध्ये झी २४तासचा समावेश आहे.

 

मराठीतील सहा चॅनल्सच्या रेटिंगमध्ये टीव्ही 9 मराठीच पहिल्या स्थानी आहे. मात्र, झी २४ तास हे चॅनल याही आठवड्यात पुढे सरसावले असून टीव्ही 9च्या पहिल्या स्थानापासून फक्त ०.७ने दूर आहे. एबीपी माझा, साम, न्यूज 18 लोकमत आणि लोकशाही या चार चॅनलपैकी एकाही चॅनलला वाढ नोंदवता आलेली नाही. उलट पुन्हा किंचित घटच झालेली आहे.

 

कोणत्या न्यूज चॅनलला किती वाटा, किती घाटा?

  • मराठी न्यूज चॅनलच्या बाजारात २८ % मार्केट शेअरसह टीव्ही9 मराठी हे न्यूज चॅनल नंबर १ आहे. त्यांच्यात ०.१ ची घट आहे.
  • दुसऱ्या क्रमांकावर २७.३% मार्केट शेअरसह झी २४ तास आहे. गेल्या गुरुवारपेक्षा त्यांच्यात ०.३ ची वाढ आहे.
  • एबीपी माझा १८.७ % मार्केट शेअरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • चौथ्या क्रमांकावर साम टीव्ही १२% मार्केट शेअरसह आहे.त्यांच्यात ०.१ची घट आहे.
  • पाचव्या क्रमांकावर ८.४ % मार्केट शेअरसह न्यूज १८ लोकमत आहे. त्यांच्यात ०.१ची घट आहे.
  • सहाव्या क्रमांकावर लोकशाही ५.५ % मार्केट शेअरसह आहे. त्यांच्यात ०.१ची घट आहे.

 

समजून घ्या कोणाचं कसं?

  • पहिल्या क्रमांकावरील टीव्ही 9च्या रेटिंगमध्ये ०.१ अशी घट होत असताना दुसऱ्या क्रमांकावरील झी २४ तासच्या मार्केट शेअरमध्ये ०.३ची वाढ झाली आहे.
  • त्यामुळे आता दोघांमधील फरक आणखी कमी होत ०.७ वर आला आहे.
  • सातत्यपूर्ण कामगिरी करत असल्याने झी २४ तास हा टीव्ही 9च्या पहिल्या स्थानासाठी धोका ठरु शकतो. अर्थात अडथळा आलाच तर तो त्यांच्या फ्रि डिशवरील अस्तित्व संपल्यास होऊ शकतो.
  • एबीपी माझासाठी १२ वा आठवडा जसं आहे तसंचा आहे.चांगले प्रयत्न सुरु असले तरी त्याचं प्रतिबिंब रेटिंगमध्ये दिसत नाही. झी २४ तासचं डीडी फ्रि डिशवरील अस्तित्व गेलं तर मात्र माझा सर्वात मोठा लाभार्थी ठरेल.
  • साम, न्यूज 18 लोकमत आणि लोकशाही या तीन चॅनल्सच्या रेटिंगमध्ये फार फरक नाही. किंचित घट आहे.

 

फ्री डिश वादाचं काय?

  • झी २४ तास हे दूरदर्शनच्या फ्री डिशवर उपलब्ध असणारे एकमेव चॅनल आहे.
  • फ्री डिशवर असलेल्या प्रसारणाचा टीव्ही रेटिंगमधील मार्केट शेअर हा ३० टक्के आहे.
  • त्यामुळे पे चॅनल असल्याने झी २४ तास जे गमावते ते फ्री डिशवरील अस्तित्वाने कमावते. त्यामुळे ते बंद झाले तर मोठा फटका ठरलेला आहे.
  • डीडी फ्री डिश ही डीटीएच सेवा चालवणाऱ्या प्रसार भारतीने बार्कडे झी २४ ताससह झी मीडियाच्या ९ प्रादेशिक न्यूज चॅनल्सचे रेटिंग रिपोर्टिंग थांबवण्याची मागणी केली आहे.
  • मात्र, अद्याप बार्कला माहिती प्रसारण खात्याने काही कळवले नसल्याने बार्कने कारवाई केलेली नाही.

 

समजून घ्या टीव्ही रेटिंगबद्दलची माहिती…

  • मराठी न्यूज चॅनल्समधील झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत हे पे चॅनल्स आहेत.
  • एबीपी माझा, टीव्ही 9, साम, लोकशाही हे इतर चार चॅनल्स हे फ्री टू एअर आहेत.
  • झी २४ तास हे दूरदर्शनच्या फ्री डिशवर उपलब्ध असणारे एकमेव चॅनल आहे.

 

सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.

  • या गुरुवारी वर्षातील ११ व्या आठवड्याचे रेटिंग आले आहे.
  • ते रेटिंग ८, ९, १० आणि ११ अशा चार आठवड्यांच्या सरासरीचं आहे.
  • याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असणार नाही.
  • चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
  • या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.

 

सरळस्पष्ट
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)

 

(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा – ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)

 

खालील लिंक क्लिक करा आणि माहिती घ्या:

टीव्ही रेटिंगचा फ्री डिश वाद: ‘झी २४ तास’सह ९ न्यूज चॅनल्सच्या रेटिंगचे रिपोर्टिंग थांबवण्याची प्रसार भारतीची मागणी!

टीव्ही रेटिंगचा फ्री डिश वाद: ‘झी २४ तास’सह झीच्या ९ न्यूज चॅनल्सचे रेटिंग रिपोर्टिंग थांबवण्याची प्रसार भारतीची मागणी!

गेल्या आठवड्यात किती होतं कुणाचं रेटिंग?

मराठी टीव्ही चॅनल्स: पुन्हा टीव्ही 9 नंबर १! झी २४ तास आणखी पुढे! पण आता फ्रि डिशचा वाद पेटण्याची शक्यता!

मराठी टीव्ही चॅनल्स: पुन्हा टीव्ही 9 नंबर १! झी २४ तास आणखी पुढे! पण आता फ्रि डिशचा वाद पेटण्याची शक्यता!

 

बाराव्या आठवड्यात मराठी प्रेक्षकांची कोणत्या न्यूज चॅनलला पसंती? टीव्ही 9साठी कुणाचा वाढला धोका ?

बाराव्या आठवड्यात मराठी प्रेक्षकांची कोणत्या न्यूज चॅनलला पसंती? टीव्ही 9साठी कुणाचा वाढला धोका ?

 

टीव्ही रेटिंगच्या घोटाळ्यानंतर तुळशीदास भोईटे यांनी सोप्या भाषेत टीव्ही रेटिंग समजवणारा व्हिडीओ केला होता.

नक्की पाहा:


Tags: muktpeethtulsidas bhoiteTV RatingZee 24 Taasटीव्ही 9तुळशीदास भोईटे
Previous Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन

Next Post

एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा, पण मुदतीतच कामावर परतण्याचा परिवहन मंत्र्यांचा इशारा!

Next Post
Anil Parab

एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा, पण मुदतीतच कामावर परतण्याचा परिवहन मंत्र्यांचा इशारा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!