Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा, पण मुदतीतच कामावर परतण्याचा परिवहन मंत्र्यांचा इशारा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Anil Parab

मुक्तपीठ टीम

पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना येत्या २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांवरील शिस्तभंगाची कारवाई मागे घेणार असल्याचे सांगितले.

 

कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही!

  • एसटी संपाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली.
  • यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले.
  • परब यांनी म्हटले की, एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, प्रशासन कारवाई करणार नाही असे सात वेळेस आवाहन केले होते.
  • उच्च न्यायालयाही आम्ही हीच भूमिका मांडली.
  • कर्मचाऱ्याची नोकरी जावी म्हणून कारवाई केली नाही.
  • मात्र, प्रशासन म्हणून शिस्तभंगाची कारवाई करावी लागली होती.
  • आता कोणतीही कारवाई करणार नसल्याचे उच्च न्यायालयात महामंडळाने सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

एसटी कर्मचाऱ्यांना पाच महिन्याचे वेतन देणार नाही!

  • मागील दोन वर्षात कोरोनामुळे महामंडळाची आर्थिक परिस्थिती नाजूक होती.
  • त्यामुळे काही जणांना त्यांची देणी मिळण्यास उशीर झाला असू शकतो.
  • एसटी कर्मचाऱ्यांना याआधीपासूनच ग्रॅच्युटी, पीएफ लागू असल्याची माहिती परब यांनी दिली.
  • सर्वोच्च न्यायालयाने याआधीच ‘नो वर्क, नो पे’ असा निकाल दिला आहे.
  • त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना पाच महिन्याचे वेतन देणार नसल्याचेही परब यांनी स्पष्ट केले.
  • उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार एसटी कर्मचारी २२ एप्रिलपर्यंत रुजू न झाल्यास त्यांना कामाची आवश्यकता नाही असे समजून सेवा समाप्त केली जाईल.
  • उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई होईल असेही त्यांनी म्हटले.

 

काय दिले उच्च न्यायालयाने आदेश?

  • उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार एसटी कर्मचारी २२ एप्रिलपर्यंत रुजू न झाल्यास त्यांना कामाची आवश्यकता नाही असे समजून सेवा समाप्त केली जाईल.
  • एसटी कर्मचाऱ्यांना येत्या २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
  • या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटीचा लाभ देण्याबाबत आदेश देण्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
  • उच्च न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या शक्य त्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Tags: Anil Parabmumbai high courtST StrikeST Workerअनिल परबएसटी कर्मचारीएसटी संपग्रॅच्युएटीनिवृत्तीवेतनमुंबई उच्च न्यायालय
Previous Post

मराठी न्यूज चॅनल्सचं या आठवड्याचं रेटिंग काय सांगतं? रेटिंग बंदी मागणीचं सावट असलेल्या झी २४ तासच्या रेटिंगचं पाऊल कुठे?

Next Post

तुरुंगातील कैद्यांच्या मजुरीत वाढ आणि जीएसटी माफ करण्याची काँग्रेसची मागणी

Next Post
Congress demands increase in prison wages and waiver of GST

तुरुंगातील कैद्यांच्या मजुरीत वाढ आणि जीएसटी माफ करण्याची काँग्रेसची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!