Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: सतत नवव्या आठवड्यात टीव्ही 9 अव्वल! २४ तास, एबीपी माझाचं काय?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
TV 9 Rank first again in TV Rating

तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम

बार्ककडून आज जारी करण्यात आलेल्या मराठी न्यूज चॅनल्सच्या टीव्ही रेटिंगमध्ये पुन्हा एकदा टीव्ही 9 मराठी चॅनलने बाजी मारली आहे. सतत नवव्या आठवड्यात या चॅनलने ही कामगिरी बजावली आहे. तर फ्री डिश वादामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या झी २४ तास या चॅनलचे या आठवड्यात प्रथमच ०.१ ने रेटिंग कमी झाले. तरीही ते पहिल्या क्रमांकापेक्षा फक्त एकापेक्षाही कमी टक्क्याने मागे आहे. त्याचवेळी एबीपी माझा ०.१ने पुढे गेले आहे. तरीही अद्याप तिसऱ्या क्रमांकावरील माझाचे रेटिंग पहिल्या क्रमांकावरील टीव्ही 9 मराठी चॅनलपेक्षा तब्बल ९.२ ने मागे आहे.

 

मराठीतील सहा चॅनल्सच्या रेटिंगमध्ये टीव्ही 9 मराठीच पहिल्या स्थानी आहे. झी २४ तास हे चॅनल या आठवड्यात किंचितसं मागे गेलं आहे. तरीही ते टीव्ही 9च्या पहिल्या स्थानापासून फक्त ०.९ने मागे आहे. एबीपी माझा ०.१ ने पुढे गेले आहे.साम, न्यूज 18 लोकमत आणि लोकशाही या चार चॅनलची स्थिती फारशी बदललेली नाही.

 

कोणत्या न्यूज चॅनलला किती वाटा, किती घाटा?

  • मराठी न्यूज चॅनलच्या बाजारात २८.१ % मार्केट शेअरसह टीव्ही9 मराठी हे न्यूज चॅनल नंबर १ आहे. त्यांच्यात ०.१ ची वाढ आहे.
  • दुसऱ्या क्रमांकावर २७.२% मार्केट शेअरसह झी २४ तास आहे. गेल्या गुरुवारपेक्षा त्यांच्यात ०.१ ची घट आहे.
  • एबीपी माझा १८.८ % मार्केट शेअरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.त्यांच्यात ०.१ची वाढ आहे.
  • चौथ्या क्रमांकावर साम टीव्ही १२% मार्केट शेअरसह आहे.
  • पाचव्या क्रमांकावर ८.३ % मार्केट शेअरसह न्यूज १८ लोकमत आहे. त्यांच्यात पुन्हा ०.१ची घट आहे.
  • सहाव्या क्रमांकावर लोकशाही ५.५ % मार्केट शेअरसह आहे.

 

समजून घ्या टीव्ही रेटिंगबद्दलची माहिती…

  • मराठी न्यूज चॅनल्समधील झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत हे पे चॅनल्स आहेत.
  • एबीपी माझा, टीव्ही 9, साम, लोकशाही हे इतर चार चॅनल्स हे फ्री टू एअर आहेत.
  • झी २४ तास हे दूरदर्शनच्या फ्री डिशवर उपलब्ध असणारे एकमेव चॅनल आहे.
  • त्यामुळे अनेक टीव्ही चॅनल्सनी त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत.
  • फ्री डिशवरील वितरणामुळे झी समुहातील झी २४ ताससह ९ प्रादेशिक वाहिन्यांना ३० टक्के जास्त रेटिंग असलेल्या मार्केटमघ्ये पोहचण्याची संधी मिळते.
  • प्रसारभारतीनेही बार्ककडे झीविरोधात तक्रार केली आहे.
  • पण अद्याप त्याप्रकरणी काहीही कारवाई झालेली नाही.

सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.

  • या गुरुवारी वर्षातील ११ व्या आठवड्याचे रेटिंग आले आहे.
  • ते रेटिंग ८, ९, १० आणि ११ अशा चार आठवड्यांच्या सरासरीचं आहे.
  • याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असणार नाही.
  • चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
  • या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.

सरळस्पष्ट

(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)

(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा – ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)

खालील लिंक क्लिक करा आणि माहिती घ्या:

मराठी न्यूज चॅनल्सचं या आठवड्याचं रेटिंग काय सांगतं? रेटिंग बंदी मागणीचं सावट असलेल्या झी २४ तासच्या रेटिंगचं पाऊल कुठे?

मराठी न्यूज चॅनल्सचं या आठवड्याचं रेटिंग काय सांगतं? रेटिंग बंदी मागणीचं सावट असलेल्या झी २४ तासच्या रेटिंगचं पाऊल कुठे?

 

टीव्ही रेटिंगचा फ्री डिश वाद: ‘झी २४ तास’सह ९ न्यूज चॅनल्सच्या रेटिंगचे रिपोर्टिंग थांबवण्याची प्रसार भारतीची मागणी!

टीव्ही रेटिंगचा फ्री डिश वाद: ‘झी २४ तास’सह झीच्या ९ न्यूज चॅनल्सचे रेटिंग रिपोर्टिंग थांबवण्याची प्रसार भारतीची मागणी!

 

मराठी टीव्ही चॅनल्स: पुन्हा टीव्ही 9 नंबर १! झी २४ तास आणखी पुढे! पण आता फ्रि डिशचा वाद पेटण्याची शक्यता!

मराठी टीव्ही चॅनल्स: पुन्हा टीव्ही 9 नंबर १! झी २४ तास आणखी पुढे! पण आता फ्रि डिशचा वाद पेटण्याची शक्यता!

 

बाराव्या आठवड्यात मराठी प्रेक्षकांची कोणत्या न्यूज चॅनलला पसंती? टीव्ही 9साठी कुणाचा वाढला धोका ?

बाराव्या आठवड्यात मराठी प्रेक्षकांची कोणत्या न्यूज चॅनलला पसंती? टीव्ही 9साठी कुणाचा वाढला धोका ?

टीव्ही रेटिंगच्या घोटाळ्यानंतर तुळशीदास भोईटे यांनी सोप्या भाषेत टीव्ही रेटिंग समजवणारा व्हिडीओ केला होता.

नक्की पाहा:


Tags: muktpeethTRPtulsidas bhoiteTV RatingTV9 Marathiटीव्ही ९ मराठीतुळशीदास भोईटेमुक्तपीठ
Previous Post

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९चा अंतिम निकाल जाहीर

Next Post

लेनच्या पुस्तकावर बंदी मागणीच्या पत्रावर पुरंदरेंचीही सही! पवारांना कसं माहित नाही? – संदिप देशपांडे

Next Post
Pawar and Puramdare

लेनच्या पुस्तकावर बंदी मागणीच्या पत्रावर पुरंदरेंचीही सही! पवारांना कसं माहित नाही? - संदिप देशपांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!