मुक्तपीठ टीम
गेल्या तीन दिवसांपासून मराठा आरक्षणासह इतर प्रमुख मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. तिसऱ्या दिवशी संभाजीराजे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांचा ब्लड प्रेशर, शुगर कमी झाली आहे. मात्र त्यांनी कोणतेही औषध घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण आलं असल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं. मराठा आरक्षण उपसमितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक आहे. यावेळी संभाजेराजे छत्रपती यांच्या वतीने एक शिष्टमंडळ उपस्थित आहे.
संभाजीराजेंची किमान ६ मागण्या मान्य करण्याची मागणी!
- गरीब मराठ्यांची अवस्था मी पाहिलीय.
- महाराजांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता.
- आरक्षणाचा दीर्घकालीन लढा आहे.
- त्यामुळे ज्या २२ मागण्यांपैकी ६ मागण्या कमीत कमी मार्गी लागाव्यात.
- या मागण्यांना न्यायालयाचे निर्बंध आहेत असं काही नाही, असं ते म्हणाले.
- याआधी देखील असे निर्णय झाले आहेत.
- माझ्या बोलण्यात काही वेगळं नाही आहे.
- मला त्रास होतोय, सरकारनं ठरवावं आता कुठपर्यंत न्यायचंय. सरकारकडून बोलवणं आलं, पण समाजाच्या प्रतिनिधींनीच चर्चा करतील. ठरवतील.
संभाजीराजेंची तब्बेत खालवली, औषधं घ्यायला स्पष्ट नकार!
- गेले तीन दिवसी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार छत्रपती संभाजी राजे यांचे आमरण उपोषण सुरू आहे.
- त्यामुळे त्यांची रक्तातील साखर कमी झालीय. रक्तदाब कमी झालाय. हृदयाचे ठोकेही वेगाने पडत आहेत.
- रक्तातील साखर वाढवण्यासाठी डॉक्टरांनी राजेंना इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला, सोबतच संभाजीराजेंना कालपासून तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवत आहे,मात्र, राजे उपोषणावर ठाम आहेत.
- कोणत्याही प्रकारचे औषधे घेण्यास संभाजीराजेंकडून नकार देण्यात आला आहे.
- डॉक्टरांकडून सलाइन लावण्याचा सल्ला देण्यात आला होता मात्र संभाजीराजेंकडून सलाइन लावून घेण्यास नकार देण्यात आला आहे.
- त्यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षण प्रश्नी आणि इतर मागण्यांवर मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे.