Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मनरेगासाठी लोकपाल नियुक्त करण्याकडे भाजपाशासित राज्यांचेही दुर्लक्ष,नव्या आर्थिक वर्षात निधी बंद होणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
BJP ruled states neglect to appoint LokPaal for MGNREGA

मुक्तपीठ टीम

आपल्या देशामध्ये केंद्र सरकारकडून विविध योजना लागू केल्या जातात. त्यात एक आहे ती मनेरगा म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. तिचे मुख्य उद्दिष्ट ‘ कामाच्या अधिकाराची हमी देणे’ असे आहे. ती राबवण्यासाठी प्रत्येक राज्यातील जिल्ह्यामध्ये लोकपालांची नियुक्ती आवश्यक असते. मात्र केंद्र सरकारची ही योजना राबवणाऱ्या राज्यांमधील तीन भाजपाशासित राज्यांसह तेलंगणा आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये लोकपालांची नेमणूक झालेली नाही. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षापासून केंद्र सरकारने अशा राज्यांना मनरेगासाठी निधी जारी करणार नसल्याचा इशारा दिला आहे. तसेच भाजपाविरोधातील काही राज्यांनीही सर्व जिल्ह्यांमध्ये लोकपालांची नियुक्ती केली नसल्याचे उघड झाले आहे.

 

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भाजपशासित गुजरात, अरुणाचल प्रदेश आणि गोवा, तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएसची सत्ता) शासित तेलंगणा आणि पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार बेटे, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकही लोकपाल नियुक्ती करण्यात आली नाही आहे.

 

या राज्यांमध्ये कमी नियुक्ती

  • काँग्रेसशासित राजस्थानसारखे इतर जिल्हे आहेत जिथे लोकपालची नियुक्ती फार कमी जिल्ह्यांमध्ये झाली आहे.
  • राजस्थानमधील ३३ पैकी केवळ चार जिल्ह्यांमध्ये या योजनेअंतर्गत लोकपाल नियुक्त करण्यात आले आहेत.
  • तृणमूल काँग्रेस शासित पश्चिम बंगालमध्ये, योजनेअंतर्गत २३ पैकी फक्त चार जिल्ह्यांमध्ये लोकपालांची नियुक्ती केली आहे.
  • हरियाणा आणि पंजाबमध्येही हीच परिस्थिती आहे.
  • दोन्ही राज्यांमध्ये, प्रत्येकी २२ जिल्हे या योजनेत समाविष्ट आहेत, परंतु हरियाणात फक्त चार आणि पंजाबमधील अशा सात जिल्ह्यांनी लोकपाल नियुक्त केले आहेत.
  • ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा म्हणाले की या राज्यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये लोकपाल नियुक्त केले पाहिजेत.

 

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही व्यक्त केली नाराजी

  • ज्या राज्यांनी मनरेगा अंतर्गत समाविष्ट असलेल्या एकूण जिल्ह्यांपैकी किमान ८० टक्के जिल्ह्यांमध्ये लोकपाल नियुक्त केले नाहीत त्यांना पुढील आर्थिक वर्षात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधीचे वाटप केले जाणार नाही.
  • यापूर्वी गुरुवारी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरिराज सिंह यांनीही यावर नाराजी व्यक्त केली होती.
  • मनरेगासाठी लोकपाल अॅपचे उद्घाटन करताना गिरीराज सिंह म्हणाले की, अनेक ठिकाणी असे दिसून आले आहे की, कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या लोकांना लोकपाल पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
  • जी राज्ये तरतुदींनुसार नियुक्ती करत नाहीत त्यांना पुढील आर्थिक वर्षापासून निधी मिळणार नाही.

Tags: BJPMGNREGAUnion Minister Giriraj Singhकेंद्रीय मंत्री गिरीराज सिंहभाजपामनरेगा
Previous Post

एकच रण, मराठा आरक्षण: उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संभाजीराजे छत्रपतींच्या प्रकृतीवर परिणाम

Next Post

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझादांच्या पुतण्यानं हाती घेतलं कमळ! काकांच्या अपमानाचं कारण!!

Next Post
jammu-kashmir

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझादांच्या पुतण्यानं हाती घेतलं कमळ! काकांच्या अपमानाचं कारण!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!