Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महिमा नवरात्रौत्सवाचा…जाणून घ्या महत्वाची माहिती!

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं, धर्म
0
Navratri 2022

मुक्तपीठ टीम

शारदीय नवरात्रोत्सव हा नऊ दिवसांचा उत्सव आहे जो आई दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांची पूजा करून, संपूर्ण देशभरात हिंदू उत्साहाने हा कार्यक्रम साजरा करतात. महिषासुर या राक्षसावर आई दुर्गेच्या विजयासाठी हा उत्सव साजरा केला जातो. अश्विन शुक्ल पक्षाच्या नवमीपासून प्रतिपदेपर्यंत शारदीय नवरात्री पाळली जाते. हा सण देशभरात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, परंतु प्रत्येक राज्यांमध्ये काही परंपरा अधिक प्रमाणात पाळल्या जातात. पहिल्या दिवशी घरी आणि मंदीरात दुर्गेच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करतात. त्यानंतर नऊ दिवस देवीचा भक्तांच्या घरी वास असतो. या काळात लोक उपवास करतात. देवीची पूजा, अर्चना आणि आरती केली जाते. वर्षभरात चार नवरात्र असतात, त्यापैकी चैत्र आणि शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. शारदीय नवरात्रीनंतर सणांची सुरूवात होते. चला जाणून घेऊया नवरात्रीचा उत्सव का साजरा केला जातो आणि ९ दिवस कोणत्या नऊ देवींची पूजा केली जाते…

का साजरा केला जातो नवरात्रीचा उत्सव?

१) श्रीरामाची कथा

  • शारदीय नवरात्रीची सुरुवात भगवान विष्णूचे अवतार श्री राम यांनी केली होती.
  • जेव्हा भगवान राम माता सीतेला रावणापासून मुक्त करण्यासाठी युद्ध करणार होते, तेव्हा त्यांनी रामेश्वरम येथे समुद्राच्या काठावर शारदीय नवरात्रीची पूजा केली.
  • नऊ दिवस मातृशक्तीची पूजा केल्यानंतर दहाव्या दिवशी श्रीरामांनी रावणाचा पराभव करून लंका जिंकली.
  • या कारणास्तव नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या पूजेनंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो.

२) आई दुर्गेची कथा

  • पौराणिक कथेनुसार, महिषासुर नावाच्या राक्षसाला ब्रह्मदेवाने वरदान दिले होते की, पृथ्वीवर राहणारा कोणताही देव, राक्षस, व्यक्ती त्याला मारण्यास सक्षम होणार नाही.
  • वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने पृथ्वीवर दहशत निर्माण केली.
  • महिषासुराचा वध करण्यासाठी आई दुर्गेचा जन्म झाला.
  • आई दुर्गा आणि महिषासुर यांच्यात नऊ दिवस युद्ध झाले आणि शेवटी आई दुर्गेने महिषासुराचा वध केला.

९ दिवस या ९ देवीच्या रूपांची पूजा केली जाते

  • पहिले रूप- आई शैलपुत्री
  • दुसरे रूप- आई ब्रह्मचारिणी
  • तिसरे रूप- आई चंद्रघंटा
  • चौथे रूप – आई कुष्मांडा
  • पाचवे रूप – आई स्कंदमाता
  • सहावे रूप – आई कात्यायनी
  • सातवे रूप- आई कालरात्री
  • आठवे रूप – आई महागौरी
  • नववे रूप- आई सिद्धिदात्री

शारदीय नवरात्री २०२२…

  • हिंदू संस्कृतीनुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्रीचा सण साजरा केला जातो.
  • नऊ दिवसांचा उत्सव ४ ऑक्टोबर, मंगळवारपर्यंत साजरा केला जाणार आहे.
  • शारदीय नवरात्रीची समाप्ती नवमी तिथीला होते.
  • दसऱ्याचा सण दुसऱ्या दिवशी म्हणजेच दशमी तिथीला साजरा केला जातो.
  • यावेळी दसरा ५ ऑक्टोबरला आहे.

Tags: NavratriNavratri 2022news2useउपयोगी बातमीनवरात्रौत्सव २०२२शारदीय नवरात्रोत्सव
Previous Post

तानाजी सावंतांच्या “मराठा आरक्षणाची खाज” वक्तव्यावर सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

Next Post

लखीमपूर खिरीमधील मयत दलित मुलींच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी घेतली भेट

Next Post
Ramdas Athwale

लखीमपूर खिरीमधील मयत दलित मुलींच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी घेतली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!