मुक्तपीठ टीम
महिंद्रा ग्रुप कंपनीची क्लासिक लीजेंड्स येझदी लाँच करणार आहे. ही रेट्रो स्टाइलची मोटरसायकल मानली जाते. रोडकिंगच्या नावाने ट्रेडमार्क दाखल करून कंपनीने काही महिन्यांपूर्वी भारतात जबरदस्त पदार्पण केले आहे. सध्या मोटर सायकलींच्या या सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्डचे वर्चस्व आहे. महिंद्राची मजबूत साथ आणि येझदीचं गुडविल या बळावर ही बाइक नव्यानं बाइकप्रेमींच्या मनावर गारुड घालेल अशी अपेक्षा आहे. त्याच वेळी, कंपनीने अलीकडेच सोशल मीडियावर येझदी अॅडव्हेंचरविषयीही माहिती दिली आहे.
रेट्रो स्टाइल मोटरसायकल येझदीचे जबरदस्त फिचर्स
- १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतात येझदी बाइक्स सादर करण्यात आल्या होत्या.
- लोकांमध्ये याची चांगलीच क्रेझ पसरली होती आणि १९९० च्या दशकाच्या अखेरीपर्यंत त्याची निर्मिती होत राहिली.
- मोटारसायकलच्या येझदी रेंजमध्ये, रोडकिंग, क्लासिक, मोनार्क सारख्या वर्सटाइल बाइक्सची विक्री चांगली झाली.
- भारतात येझदी बाइक्सची स्वतःची क्रेझ होती.
- या बाइक्स त्या काळातील बॉलीवूड चित्रपटांमध्येही झळकताना दिसल्या.
आता रॉयल एनफिल्डशी स्पर्धा
- येझदी रोडकिंग एडीव्ही ही एक रेट्रो शैलीतील अॅडव्हेंच बाईक आहे.
- सध्या या विभागात रॉयल एनफिल्डचे वर्चस्व आहे.
- अशा परिस्थितीत ही बाईक लाँच केल्यानंतर ती थेट रॉयल एनफिल्डच्या ऑफ-रोडिंग बाईक रॉयल एनफिल्ड हिमालयनशी टक्कर देईल अशी शक्यता आहे.