Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रादेशिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश, २२ सुवर्ण, २, ३ रजत अशी ४५ पदकांची नं. १ कमाई!

November 2, 2021
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
regional skill development competition

मुक्तपीठ टीम 

केंद्र शासनामार्फत गांधीनगर (गुजरात) येथे आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम प्रादेशिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राने घवघवीत यश मिळविले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून गेलेल्या युवकांनी २२ सुवर्ण आणि २३ रजत पदके, अशा एकुण ४५ पदकांची कमाई करुन स्पर्धेत अग्रस्थान पटकावले आहे. या सर्व स्पर्धकांचे राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

राज्यातून आता एकुण ६० पेक्षा अधिक स्पर्धक बंगळुरु येथे होणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागी होणार असून तेथील विजेते स्पर्धक पुढीलवर्षी शांघाय (चीन) येथे होणाऱ्या जागतिक स्किल्स चँपियनशीपमध्ये सहभागी होतील. गांधीनगर स्पर्धेत पश्चिम प्रादेशिक ५ राज्ये आणि ओडीशा राज्याचा सहभाग होता. एकुण ८२ पैकी ४५ पदके पटकावून ५५ टक्के पदकांवर महाराष्ट्रातील युवक-युवतींनी आपले नाव कोरले आहे.  स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने २२ सुवर्ण आणि २३ रजत (एकुण ४५), राजस्थानने ८ सुवर्ण आणि ८ रजत (एकुण १६), गुजरातने ८ सुवर्ण आणि ४ रजत (एकुण १२), मध्यप्रदेशने ३ सुवर्ण आणि १ रजत (एकुण ४) गोव्याने १ सुवर्ण आणि २ रजत (एकुण ३) तर ओडीशाने २ रजत पदकांची कमाई केली आहे.

 

या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कल्पक तरुणांना जागतिक पातळीवर त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे. कौशल्य विकासात देशाला अग्रेसर बनविताना महाराष्ट्र त्यात महत्वपूर्ण योगदान देईन असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. स्पर्धेत सहभागी तरुणांनी जिद्दीने शांघाय येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेत यश मिळविण्याचे ध्येय ठेवावे. २०२३ मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या स्पर्धेसाठीही आतापासूनच तयारी सुरु करावी. जागतिक पातळीवर कौशल्य क्षेत्रात देशाचे नाव उज्वल करताना त्यात महाराष्ट्रातील युवक-युवती महत्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

 

आता जागतिक स्पर्धेतील विजयाचे ध्येय ठेवावे -प्रधान सचिव मनिषा वर्मा

कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी राज्यातील सर्व स्पर्धक विविध कौशल्य क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत आहेत. गांधीनगर येथील प्रादेशिक स्पर्धेत महाराष्ट्रातील युवक-युवतींनी मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. या स्पर्धकांनी आता राष्ट्रीय स्पर्धेची आणि त्यानंतर होणाऱ्या जागतिक स्पर्धेची जय्यत तयारी करावी. स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या युवकांना कौशल्य विकास विभागामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यात येईल. उर्वरित विद्यार्थ्यांनाही त्यांच्यातील कौशल्याला चालना देण्याच्या अनुषंगाने विभाग संपूर्ण मदत करेल असे सांगितले.

 

महाराष्ट्रातील तरुणांचे यश अद्भूत – दीपेन्द्र सिंह कुशवाह

कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी गांधीनगर येथील स्पर्धेत महाराष्ट्रातील तरुणांनी मिळविलेले यश अद्भूत असेच आहे. यासाठी या तरुणांनी फार मेहनत घेतली आहे. आता राष्ट्रीय आणि जागतिक स्पर्धेसाठीही त्यांनी अशीच तयारी करावी. या युवक-युवतींना विविध नामवंत उद्योगांशी कशा पद्धतीने जोडता येईल यासाठी विभाग प्रयत्न करेल. स्पर्धेत यश मिळविण्याबरोबरच या युवकांना त्यांच्यातील नवसंकल्पना आणि कौशल्याचा उद्योजकतेसाठी वापर करता येईल. कौशल्य विकास सोसायटीमार्फत यासाठी चालना देण्यात येईल असे सांगितले.

 

सुवर्ण पदक विजेते खालीलप्रमाणे :राज्यातील मोहम्मद सलमान अन्सारी, रिंकल करोत्रा, दिशा सोनवणे, कोमल शिवाजीराव कोडलीकर, अंकीता अंबाजी गांगुर्डे, ज्ञानेश्वर बाबुराव पांचाळ, स्टॅनली सोलोमन, योगेश दत्तात्रय राजदेव, देवेज्या, श्रीराम कुलकर्णी, लावण्या पुंड,  विश्वजित रेवनाथ भुर्के, आयुषी अरोरा, पुर्वी सिधपुरा, गणेश भावे दगडोबा, मित्रा राव, अर्जुन मोगरे,  ओंकार गौतम कोकाटे, जीवन संपत चौधरी, तोजांगण रवींद्र ढाणू, विकास चौधरी, सजिव कुमार सबवथ यांनी सुवर्ण पदक पटकावले.

 

 

तर रजत पदक विजेते खालीलप्रमाणे :मिलींद निकम, योगेश अनिल खंडागळे, सलमान रफीक शेख, वेद इंगळे, हर्षल गजानन शिरभाते, सचिन भारत जाधव, वृंदा पाटील, सृष्टी मित्रा, यश दिनेश चव्हाण, आकांक्षा केलास पवार, मिर्झा कबिरुल्लाह बेग मिर्झा असदुल्लाह बेग, प्रियांका सिद्धार्थ टिळक, योगेश दत्तू गनगोडे, प्रतिक राजेंद्र हिनघेद, आनंद फकिरा घोडके, ध्रुव पाटील, ओम विनायक गायकवाड, अश्लेषा भरत इंगवले, अभिशेक भाई पाटील, मोहम्मद हानिफ मोहम्मद यासीन बेलीम, आदित्य दीपक हुगे,  भार्गव कुलकर्णी, जुनेद अडेनवाला आदींचा समावेश आहे.


Tags: Dipendra Singh KushwahagandhinagarGujaratNawab MalikRegional skills competitionsगांधीनगरगुजरातदीपेन्द्र सिंह कुशवाहप्रादेशिक कौशल्य स्पर्धेा
Previous Post

रात्री अनिल देशमुख तर दिवसा अजित पवारांवर आफत! हजार कोटींची मालमत्ता जप्त करण्याची आयकर नोटीस!

Next Post

आघाडी सरकारच्या निषेधार्थ पुण्यात भाजपाचे काळी फीत लावून आंदोलन

Next Post
chandrakant patil

आघाडी सरकारच्या निषेधार्थ पुण्यात भाजपाचे काळी फीत लावून आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!