Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

खेलो इंडिया युथ गेम्ससाठी महाराष्ट्राचा कबड्डी संघ हरियाणाकडे रवाना

June 2, 2022
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Maharashtra Kabaddi team leaves for Haryana for Khelo India Youth Games

मुक्तपीठ टीम

खेलो इंडिया युथ गेम्समध्ये मागील तीन स्पर्धांवर महाराष्ट्रातील खेळाडूंचे वर्चस्व राहिले आहे. राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने याहीवर्षी त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे त्यांची कामगिरी उंचावली आहे. क्रीडा मंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र या वर्षी हॅट्ट्रीक करेन, असा विश्वास व्यक्त करून संघातील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या             

हरियाणा येथे होणाऱ्या चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्ससाठी सराव शिबिरानंतर महाराष्ट्राचा कबड्डी संघ रवाना झाला. बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेत पदक मिळवण्याचा संघाने निर्धार केला.            

क्रीडा विभागाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे हे स्पर्धेचे नोडल ऑफिसर आहेत. क्रीडा अधिकारी अरूण पाटील हे मुख्य व्यवस्थापक आहेत. सोबत अन्य पदाधिकारी देखील संघासोबत आहेत.            

या वर्षीच्या स्पर्धेत ३७१ खेळाडू सहभागी झाले आहेत. २१ क्रीडा प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. हरियाणातील पंचकुला या मुख्य मैदानावर या स्पर्धा होत आहेत. ४ जून रोजी स्पर्धेचे उदघाटन होईल. १३ जून रोजी स्पर्धेची सांगता होणार आहे.            

मागील तीन स्पर्धांवर महाराष्ट्रातील खेळाडूंचे वर्चस्व राहिले. राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे त्यांची कामगिरी उंचावली आहे. गीता साखरे (पुणे) या मुलींच्या कबड्डी संघाच्या प्रशिक्षक, राजेश पाडावे (मुंबई) मुलांच्या संघाचे प्रशिक्षक आहेत. क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे हे संघ व्यवस्थापक आहेत.

सहभागी क्रीडा प्रकार            

राज्यातील तब्बल २१ क्रीडाप्रकारातील संघ खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी होणार आहेत. एकूण ३५६ खेळाडू आहेत. खेळाचे नाव व कंसात सहभागी खेळाडूंची संख्या कब्बडी (२४),  बॅडमिंटन (४), कुस्ती  (३३), गटका (१६), थांग ता (५), योगासन (२२), वेटलिफ्टिंग (२०), जिम्नॅस्टिक (४५), सायकल ट्रॅक ( ६), शुटिंग (७), टेनिस (६), मल्लखांब (१२), जलतरण (२८), खो-खो (२४), बास्केटबॉल (१२), अॅथलेटिक्स (३६), टेबल टेनिस (८), बॉक्सिंग (१६), ज्युदो (१४), सायकल रोड रेस (६), आर्चरी (१२). असे २१ संघ स्पर्धेत उतरले आहेत.


Tags: haryanaKhelo India Youh GamesMaharashtraMaharashtra Kabaddi Teamखेलो इंडिया युथ गेम्समहाराष्ट्रमहाराष्ट्र कबड्डी संघहरियाना
Previous Post

ईडीनं खडसेंना जी जमीन रिकामी करायचे आदेश दिले, ते प्रकरण आहे तरी काय?

Next Post

काश्मिरात शिक्षिकेच्या हत्येमुळे शिवसेना आक्रमक, दहशतवाद्यांशी सामन्यासाठी शस्त्रांची मागणी!

Next Post
rajni bala

काश्मिरात शिक्षिकेच्या हत्येमुळे शिवसेना आक्रमक, दहशतवाद्यांशी सामन्यासाठी शस्त्रांची मागणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!