Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काश्मिरात शिक्षिकेच्या हत्येमुळे शिवसेना आक्रमक, दहशतवाद्यांशी सामन्यासाठी शस्त्रांची मागणी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rajni bala

मुक्तपीठ टीम

कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित शिक्षिकेची शाळेतच गोळी घालून हत्या केली. काश्मिरात टार्गेट किलिंगची ही तिसरी घटना आहे. या घटनेवर संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. यावर आता शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “गरज पडल्यास इथल्या महिलांना दहशतवाद्यांशी सामना करायला शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?

  • नीलम गोऱ्हे म्हणाल्या, काश्मिरात मुलींना त्यांच्या हक्कांबाबत जागृत करणाऱ्या शिक्षकांना लक्ष्य केलं जात आहे.
  • त्यांना महिलांना पुन्हा आपल्या घरांमध्ये बंदिस्त करुन ठेवायचं आहे.
  • काश्मिरमधील शिक्षकांच्या सुरक्षेची हमी केंद्रानं द्यावी, हे अत्यंत महत्वाचं आहे.
  • तसेच गरज पडल्यास त्यांना शस्त्र बाळगण्यालाही परवानगी द्यावी.

नेमकं प्रकरण काय?

  • ३६ वर्षीय रजनी बाला यांची मंगळवारी दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.
  • त्या सांबा जिल्ह्यातील रहिवासी होत्या.
  • काश्मिरी पंडित रजनी बाला कुलगाममधील एका शाळेत शिक्षिका होत्या, त्यांना पंतप्रधान विशेष पॅकेज अंतर्गत पुन्हा काश्मीरला बोलावून नोकरी देण्यात आली होती.
  • दरम्यान दहशतवादी शाळेमध्ये शिरले आणि त्यांनी रजनी बाला यांच्यावर गोळीबार सुरु केला.
  • गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या रजनी यांना रुग्णालयात दाखल करताच त्यांचा मृत्यू झाला.

बाला यांच्या हत्येनंतर तीव्र निदर्शने सुरु!!

  • काश्मिरी पंडित संघटनेसह डोगरा मोर्चानेही या हत्येचा निषेध करत शहरात रॅली काढली.
  • बजरंग दलाच्या सुमारे २०० कार्यकर्त्यांनीही बाला यांच्या हत्येचा निषेध केला.
  • शिवसेना कार्यकर्त्यांनीही निदर्शने केली.

Kashmiri Pandit

काश्मिरी पंडितांनी व्यक्त केली स्थलांतराची भीती!

  • काश्मिरी पंडित नेते विनोद टिक्कू यांनी या हत्येबाबत सांगितले की, दहशतवाद्यांनी खोऱ्यात २२ हिंदूंची हत्या केली असून १४ जणांना जखमी केले आहे.
  • चार मंदिरांवरही हल्ले झाले आहेत.
  • काश्मीरमधील अल्पसंख्याकांवर हा अघोषित हल्ला असून परिस्थिती सामान्य असल्याचे सरकार सांगत आहे.
  • रजनी बाला यांच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या एका काश्मिरी पंडिताने सांगितले की, आम्ही ठरवले आहे की जर सरकारने २४ तासांच्या आत आमच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होईल.
  • काश्मिरी पंडितांना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्याची प्रक्रिया सुरू असून, सरकारकडे दाद मागून समाज कंटाळला आहे.
  • आम्हाला स्थलांतरित केले पाहिजे जेणेकरून आम्हाला वाचवता येईल.

Tags: KashmirKashmiri Panditneelam gorheRajni Balaकाश्मिरकाश्मिरी पंडितकेंद्र सरकारनीलम गोऱ्हेरजनी बाला
Previous Post

खेलो इंडिया युथ गेम्ससाठी महाराष्ट्राचा कबड्डी संघ हरियाणाकडे रवाना

Next Post

सायबर गुन्हेगारीविरोधात सर्वंकष धोरण तयार करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलांचे निर्देश

Next Post
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सायबर सेल संदर्भात बैठक 1

सायबर गुन्हेगारीविरोधात सर्वंकष धोरण तयार करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!