मुक्तपीठ टीम
शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहेत. शिवसेनेला बंडखोरीनं हादरवणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यालाच या यात्रेच्या पहिल्या मेळाव्यासाठी निवडण्यात आले आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव, सचिव खासदार विनायक राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या तोफा या यात्रेत महाराष्ट्रभर धडाडणार आहेत.
- महाप्रबोधन यात्रेदरम्यान राज्यभरात अनेक मोर्चे काढण्यात येणार आहेत.
- महाराष्ट्रातील जनतेसमोर बंडखोरांच्या बंडामागील वास्तव मांडत त्यांचं प्रबोधन घडवण्याचा प्रयत्न आहे.
- जनतेच्या प्रश्नांवर आवाज दउठवत त्यांना शिवसेनेशी जोडले जाईल.
- शिवसैनिकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी स्थानिक बंडखोरांनाही लक्ष्य केले जाईल.
- रविवार, ९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये पहिला मेळावा होईल.
महाप्रबोधन यात्रेसाठी जोरदार तयारी
- महाप्रबोधन यात्रेच्या पोस्टर्सवर ‘आपला महाराष्ट्र, महान महाराष्ट्र’ अशी घोषणा आहे.
- त्यावर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांची छायाचित्रे आहेत.
- या दोघांनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे आहेत.