Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एसटी संपावरून महादेव जानकरांचा घरचा आहेर का? म्हणाले आमचं सरकार असतानाही काय झालं?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mahadev jankar

मुक्तपीठ टीम

एसटी शासनामध्ये विलिनीकरण करावं या मागमीसाठी गेल्या १४ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मात्र असं असताना रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे, “आमचं सरकार होतं तेव्हाही हा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हाही कुठे झालं? बाहेर बोलतांना एक असतं आणि आत गेल्यावर वेगळं असतं. सिस्टीमचा भाग असतो, त्याप्रमाणं जावं लागतं. म्हणून जनतेनं हुशार झालं पाहिजे,” असं महादेव जानकर म्हणाले.

 

जानकरांनी भाजपालाच का सुनावले?

  • महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते आहेत.
  • पक्ष सर्वसमावेशक असला तरी त्यांचा प्रभाव जास्त प्रमाणात धनगर समाजावर होता.
  • भाजपाविरोधातील गोपीचंद पडळकरांना सोबत घेऊन भाजपानं बळ दिलं.
  • त्यामुळे महादेव जानकर नाराज झाल्याचे मानले जाते.
  • ते गेले काही दिवस स्पष्ट शब्दात भाजपाला सुनावत असतात.
  • एसटी संपाचं नेतृत्व सदाभाऊ खोतांप्रमाणेच गोपीचंद पडळकरांना देण्यात आलं आहे.
  • त्यामुळे महादेव जानकर भाजपालाच आरसा दाखवण्याचं आणि एसटी कर्मचाऱ्यांना सावध करण्याचं काम करत आहेत.

 

महादेव जानकरांनी कसं सुनावलं?

  • आमच्या काळातही एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला होता.
  • तेव्हा कुठं झाले विलिनीकरण?
  • रस्त्यावर असताना एक बोलावं लागत आणि आत गेल्यावर एक असतं.
  • हा सिस्टीमचा भाग आहे.
  • त्यामुळं जनतेनं हुशार झालं पाहिजे, हाच एक त्यावरचा पर्याय आहे.

 

रविकांत तुपकर यांची विचारपूस

  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या भेटीसाठी महादेव जानकर आले होते.
  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे माझे चांगले मित्र असून त्यांना भेटण्यासाठी आलो असल्याचं मत महादेव जानकर यांनी व्यक्त केलं.
  • तर तुपकर हे चळवळीतील कार्यकर्ते सून कुठलीही माय बाळ रडल्याशिवाय दूध पाजत नाही म्हणत तुपकर यांनी
  • आंदोलन केले म्हणून सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात त्यांना चर्चा करायला बोलावले. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी व्हावे, म्हणून मी आलो असल्याचे मत महादेव जानकर यांनी व्यक्त केलं आहे.
  • जानकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.

Tags: BJPgopichand padalkarmahadev jankarRashtriya samajwadi partySadabhau Khotswabhimani shetkari sanghatnaएसटी विलिनीकरणगोपीचंद पडळकरभाजपामहादेव जानकररविकांत तुपकरसदाभाऊ खोतस्वाभिमानी शेतकरी संघटना
Previous Post

किमान हमीभाव…एमएसपी म्हणजे नेमकं काय?

Next Post

सावधान! तुमच्या स्मार्टफोनमुळेच तुम्ही हॅकिंगचे बळी ठरू शकता!

Next Post
Smartphone hack

सावधान! तुमच्या स्मार्टफोनमुळेच तुम्ही हॅकिंगचे बळी ठरू शकता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!