Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किमान हमीभाव…एमएसपी म्हणजे नेमकं काय?

कृषी कायदे मागे घेऊनही शेतकरी का नाराज?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bharti Pawar yani takla ahe

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ नोव्हेंबर रोजी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. मात्र असं असताना हे कृषीविषयक कायदे रद्द करण्याची प्रक्रिया सरकारने संसदेत पूर्ण करावी, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन चालूच ठेवलं आहे. याशिवाय, सरकारनं किमान हमी भाव म्हणजे एमएसपीसाठी कायदा, अशीही शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे चर्चेत आलेला किमान हमीभाव…एमएसपी म्हणजे काय? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

 

सरकार द्वारा जिन कृषि सुधारो की बात की जा रही है। वह नकली व बनावटी है
इन सुधारो से किसानों की बदहाली रुकने वाली नही है
कृषि व किसान के लिए न्यूनतम समर्थन मूल्य को कानून बनाना सबसे बड़ा सुधार होगा#MSP_नहीं_तो_आंदोलन_वहीं #MSP_की_गारंटी_भी_चाहिए @ANI @PTI_News @PMOIndia pic.twitter.com/2uaYpJug4d

— Rakesh Tikait (@RakeshTikaitBKU) November 21, 2021

किमान हमी दर एमएसपी म्हणजे काय?

  • किमान हमीभाव (MSP) ही एखाद्या पिकाची किमान किंमत आहे ज्यावर सरकार शेतकऱ्यांकडून खरेदी करते.
  • शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा हे किमान दीडपट अधिक असते.
  • बाजारात पिकाची किंमत कितीही कमी झाली तरी, सरकारला शेतकऱ्यांकडून निश्चित केलेल्या किंमतीतच पिकांची खरेदी करावी लागते.

 

एमएसपी कोण ठरवतो?

  • कृषी खर्च आणि किमती आयोगाच्या (CACP) शिफारशीनुसार सरकारकडून रब्बी आणि खरीप हंगामात वर्षातून दोनदा किमान आधारभूत किंमत जाहीर केली जाते.
  • ऊसाची आधारभूत किंमत ऊस आयोग ठरवतो.

 

एमएसपी का ठरवला जातो?

  • पिकाची एमएसपी निश्चित केली जाते जेणेकरून शेतकर्‍यांना त्यांच्या पिकाची कोणत्याही परिस्थितीत किमान योग्य किंमत मिळावी.

कोणत्या पिकांसाठी एमएसपी ठरवला जातो?

  • कृषी खर्च आणि मूल्य आयोग (कृषी मूल्य आयोग) दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामातील पिके येण्यापूर्वी एमएसपीबद्दल अभ्यास करते.
  • सरकार तृणधान्ये, कडधान्ये आणि काही व्यावसायिक पिकांसह २४ पिकांसाठी किमान हमीभाव निश्चित करते.
  • सरकारकडून त्या पिकांचे दर निश्चित केले जातात.
  • त्यानंतर त्या भावानेच शेतकऱ्यांकडून खरेदी केली जाते.

देशात एमएसपीची तरतूद कधीपासून सुरू झाली?

  • १९६५ मध्ये हरित क्रांतीच्या वेळी एमएसपीची घोषणा करण्यात आली होती.
  • सन १९६६-६७ मध्ये गहू खरेदीच्या वेळी सुरुवात झाली.
  • आयोगाने २०१८-१९ मध्ये खरीप हंगामात किंमत धोरण अहवालात कायदा लागू करण्याची सूचना केली होती.

 

एमएसपीचा वाद का?

  • एमएसपीअंतर्गत शेतकर्‍यांना त्यांची पिके निश्चित केलेल्या किंमतीपेक्षा कमी दरात विकावी लागत नाही.
  • सरकारला निश्चित केलेल्या किंमतीतच या पिकांची खेरदी करावी लागते.
  • कृषी कायद्यांद्वारे एमएसपी रद्द करण्याचा सरकारचा कट होता, असा आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप आहे.

Tags: Farmer protestMSPPM Narendra modiएमएसपीदिल्ली शेतकरी आंदोलनपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला विश्वास पाटील, जावेद अख्तर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

एसटी संपावरून महादेव जानकरांचा घरचा आहेर का? म्हणाले आमचं सरकार असतानाही काय झालं?

Next Post
mahadev jankar

एसटी संपावरून महादेव जानकरांचा घरचा आहेर का? म्हणाले आमचं सरकार असतानाही काय झालं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!