मुक्तपीठ टीम
एसटी शासनामध्ये विलिनीकरण करावं या मागमीसाठी गेल्या १४ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मात्र असं असताना रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे, “आमचं सरकार होतं तेव्हाही हा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हाही कुठे झालं? बाहेर बोलतांना एक असतं आणि आत गेल्यावर वेगळं असतं. सिस्टीमचा भाग असतो, त्याप्रमाणं जावं लागतं. म्हणून जनतेनं हुशार झालं पाहिजे,” असं महादेव जानकर म्हणाले.
जानकरांनी भाजपालाच का सुनावले?
- महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते आहेत.
- पक्ष सर्वसमावेशक असला तरी त्यांचा प्रभाव जास्त प्रमाणात धनगर समाजावर होता.
- भाजपाविरोधातील गोपीचंद पडळकरांना सोबत घेऊन भाजपानं बळ दिलं.
- त्यामुळे महादेव जानकर नाराज झाल्याचे मानले जाते.
- ते गेले काही दिवस स्पष्ट शब्दात भाजपाला सुनावत असतात.
- एसटी संपाचं नेतृत्व सदाभाऊ खोतांप्रमाणेच गोपीचंद पडळकरांना देण्यात आलं आहे.
- त्यामुळे महादेव जानकर भाजपालाच आरसा दाखवण्याचं आणि एसटी कर्मचाऱ्यांना सावध करण्याचं काम करत आहेत.
महादेव जानकरांनी कसं सुनावलं?
- आमच्या काळातही एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला होता.
- तेव्हा कुठं झाले विलिनीकरण?
- रस्त्यावर असताना एक बोलावं लागत आणि आत गेल्यावर एक असतं.
- हा सिस्टीमचा भाग आहे.
- त्यामुळं जनतेनं हुशार झालं पाहिजे, हाच एक त्यावरचा पर्याय आहे.
रविकांत तुपकर यांची विचारपूस
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या भेटीसाठी महादेव जानकर आले होते.
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे माझे चांगले मित्र असून त्यांना भेटण्यासाठी आलो असल्याचं मत महादेव जानकर यांनी व्यक्त केलं.
- तर तुपकर हे चळवळीतील कार्यकर्ते सून कुठलीही माय बाळ रडल्याशिवाय दूध पाजत नाही म्हणत तुपकर यांनी
- आंदोलन केले म्हणून सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात त्यांना चर्चा करायला बोलावले. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी व्हावे, म्हणून मी आलो असल्याचे मत महादेव जानकर यांनी व्यक्त केलं आहे.
- जानकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.