Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठीही ‘वाझे’ हवेत का?”

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा आघाडी सरकारला सवाल

August 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
madhav bhandari

मुक्तपीठ टीम

राज्य लोकसेवा आयोगाच्या ४ रिक्त जागा ३१ जुलैपूर्वी भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. आता त्यांनी ही पदे भरण्यासाठी अजितदादांनी ३० सप्टेंबरची मुदत दिली आहे. ही चालढकल पाहता सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठी आघाडी सरकारला एखाद्या ‘वाझे’ ची प्रतीक्षा आहे का, असा खोचक सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

 

प्रसिद्धी पत्रकात भांडारी यांनी म्हटले आहे की, आयोगाचे एकूण ६ सदस्य असतात. या पैकी ४ सदस्यांच्या जागा अनेक महिन्यांपासून भरल्याच गेल्या नाहीत. आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त जागा ३१ जुलैपूर्वी भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. ही मुदत संपल्यावर अजितदादांनी या जागा भरण्यासाठी ३० सप्टेंबरचा मुहूर्त जाहीर केला आहे. लोकसेवा आयोग सदस्यांच्या जागा भरण्यासाठी एवढा वेळ लागण्याएवढा हा जटील विषय नाही. ‘योग्य’ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी आघाडी सरकार एखाद्या वाझेंची वाट पहात असावे अशी शंका येऊ लागली आहे.

 

आयोग सदस्यांच्या रिक्त जागा भरल्या न गेल्याने लोकसेवा आयोगाला पूर्ण क्षमतेने काम करता येत नाही. परीक्षा घेणे, निकाल लावणे, पदांची भरती करणे अशी आयोगाची अनेक कामे वेळेत पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होतात. या दिरंगाईचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. शेकडो होतकरू युवक परीक्षा होण्याची आणि परीक्षांचा निकाल लागण्याची वाट बघत राहतात. लोकसेवा आयोगाच्या दिरंगाईमुळेच स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली हे लक्षात घेऊन राज्य सरकारने आयोग सदस्यांच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात, असेही भांडारी यांनी पत्रकात नमूद केले आहे.

 


Tags: Aijt pawarBJPmadhav bhandariMahavikas aghadistate govtउपमुख्यमंत्री अजित पवारमाधव भांडारीलोकसेवा आयोगस्वप्नील लोणकर
Previous Post

“पॅकेजची घोषणा होते, मग त्यातला पैसा कुठे जातो? कटू पण कायमस्वरुपी तोडगा!”

Next Post

ई-रुपी म्हणजे काय? पंतप्रधान मोदींनी लॉन्च केलेल्या या कॅशलेस सेवेविषयी जाणून घ्या!

Next Post
pm (4)

ई-रुपी म्हणजे काय? पंतप्रधान मोदींनी लॉन्च केलेल्या या कॅशलेस सेवेविषयी जाणून घ्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!