Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ई-रुपी म्हणजे काय? पंतप्रधान मोदींनी लॉन्च केलेल्या या कॅशलेस सेवेविषयी जाणून घ्या!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
pm (4)

मुक्तपीठ टीम

आता कॅशलेस व्यवहारासाठी इंटरनेट नसले तरी चालेल. तरीही ग्राहकांना कॅशलेस व्यवहार करणे शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाँच केलेला ई-रुपी ही नवी डिजिटल पेमेंट सेवेमुळे हे सारं शक्य होणार आहे. आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस व्यवहारांसाठी ई-रुपी इलेक्ट्रॉनिक व्हाऊचर बेस्ड पेमेंट सिस्टीम लॉन्च केली.
डिजिटल करन्सीच्या दृष्टीने भारताचं पहिलं पाऊल मानली जाणारी ई-रुपी ही सेवा आहे तरी कशी ते जाणून घेऊया…

 

काय आहे ई-रुपी?

  • ई-रुपी एक डिजीटल पेमेंट सुविधा आहे.
  • ई-रुपी ही एक कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टम आहे.
  • ई-रुपी क्युआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंगच्या माध्यमातून काम करणारे ई व्हाऊचर आहे.
  • या कार्डाचा वापर करुन डिजिटल पेमेंट आणि इंटरनेट बँकिंगसारखे व्यवहार करणे शक्य आहे.
  • ई-रुपी एक प्रकारे ऑनलाईन चेक असेल, जो एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पाठवू शकेल.
  • ज्याला तो चेक वटवायचा आहे, तो मोबाईल क्रमांक आणि ओटीपी द्वारे ते पैसे आपल्या खात्यात घेऊ शकतो.

 

ई-रुपीचा वापर कुठे कुठे शक्य?

  • नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं त्यांच्या युपीआय मंचावर, आर्थिक सेवाविभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्यानं विकसित केलं आहे.
  • ई-रुपीचा वापर हा केंद्र सरकारच्या अनेक योजनांसाठी केला जाऊ शकतो.
  • ई-रुपी प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना कार्ड, डिजिटल पेमेंट अॅप्स किंवा इंटरनेट बँकिंग न घेता व्हाऊचर वटवण्याची परवानगी देईल.
  • मदर अँड चाईल्ड वेल्फेअर स्कीम, टीबी इरॅडिकेशन प्रोग्राम अंतर्गत देण्यात येणाऱी औषधे आणि पोषण आहार, तसेच आयुषमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना, आणि फर्टिलायझर सबसिडी योजनेमधील सुविधांसाठीही ई-रुपीचा वापर केला जाऊ शकतो.
  • यासोबतच, खासगी क्षेत्रातील कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांना वेल्फेअर अँड कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रोग्राम अंतर्गत ही डिजिटल व्हाऊचर्स देऊ शकतात; असं सरकारने स्पष्ट केलं आहे

Tags: Digital PaymentE-RUPIpm narenda modiई-रुपीडिजिटल पेमेंटनॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियापंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

“लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठीही ‘वाझे’ हवेत का?”

Next Post

“महापुरासारख्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजनांना प्राधान्य; पूररेषेची अमंलबजावणी काटेकोरपणे व्हावी”

Next Post
cm uddhav Thackeray

"महापुरासारख्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजनांना प्राधान्य; पूररेषेची अमंलबजावणी काटेकोरपणे व्हावी"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!