Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पॅकेजची घोषणा होते, मग त्यातला पैसा कुठे जातो? कटू पण कायमस्वरुपी तोडगा!”

सांगलीत मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्तांशी संवाद

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
cm thackeray

मुक्तपीठ टीम

सांगलीत अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगलीच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. दौऱ्यातील पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भिलवडी गावाची पाहणी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला, संकट आलं की पॅकेज जाहीर केली जातात. ही आपली प्रथा आणि परंपरा आहे. मग त्यातला पैसा कुठे जातो ते कळत नाही. मला अशी थोतांडं येत नाही. मला खोटं बोलता येत नाही. जे करायचं ते प्रामाणिकपणे केलं जाईल. ते केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील भिलवडीकरांना दिली.

 

भिलवडीकरांना मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?

  • ज्या क्षणी अतीवृष्टी होणार हा अंदाज आला, तेव्हापासून प्रशासन कामाला लागले.
  • जिथं जिथं शक्य होईल तिथल्या धोकादायक वस्त्यांमधील नागरिकांचे आपण स्थलांतर करायला सुरवात केली.
  • जवळपास ४ लाख नागरिकांचे स्थलांतर झाले आहे.
  • जीवितहानी होऊ नये, हा आपला प्रधान्यक्रम होता.
  • विश्वजित कदम यांच्याकडून माहिती घेतली आहे.
  • अनेकांना घरं सोडून जावं लागलं.
  • हा काही आनंदाचा भाग नाही, पण नदी फुगली होती.
  • अनेकांच्या घरात पाणी गेलं तसेच संसार उघड्यावर आले.
  • आर्थिक नुकसान देखील झाले आहे.
  • शेतीचं देखील नुकसान झालं आहे.
  • मी तळीये, चिपळूण, कोल्हापूर याठिकाणी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे.
  • नुकसान पाहिले आहे.
  • तुमच्या सर्वांच्या साथीने मी मार्ग काढणारच.

 

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “आपल्याला नम्र विनंती आहे की, किती नुकसान झाले आहे, त्याचे सगळी आकडेवारी मिळत आहे. शेती, घरदार एकूणच किती नुकसान झाले याचा अंदाज घेणं सुरु आहे.

 

मौजे डिग्रजवासियांना धीर देत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ग्रामस्थांची निवेदने स्वीकारली आणि त्यांच्याशी संवाद साधला. pic.twitter.com/LRkWiLvRVo

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 2, 2021

 

कटू निर्णय, पण तोडगा कायमस्वरूपी आवश्यक!

  • काही ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढावा लागणार आहे.
  • कटू निर्णय घ्यावे लागतील, आपली त्याला तयारी हवी.
  • कारण दरवर्षी हे पुराचे संकट येणार आणि आपण त्यातून उभे राहणार की, परत दुसऱ्या वर्षी तेच.
  • आपण पाण्याच्या पातळी मोजत बसण्यासाठी आपलं आयुष्य नाही.
  • सरपंच मंडळीकडून निवेदनं स्वीकारली आहेत.
  • या सगळ्यांचा आढावा घेवून कायमस्वरुपी कोणती उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्या दृष्टीने सरकार निर्णय घेईल.

Tags: Bhilawadichief minister uddhav thackerayflood areasangliभिलवडीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

आता महसूल सेवांचं डिजिटलीकरण! पंधरा रुपयात ऑनलाईन ७-१२ नव्या स्वरुपात!

Next Post

“लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठीही ‘वाझे’ हवेत का?”

Next Post
madhav bhandari

"लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठीही 'वाझे' हवेत का?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!