Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

साहित्यात सामाजिक परिवर्तन करण्याची क्षमता – प्रा. लक्ष्मणराव ढोबळे

वंचित विकास संस्थेला राष्ट्रीय बंधुता पुरस्कार प्रदान

November 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
लक्ष्मणराव ढोबळे

मुक्तपीठ टीम 

“साहित्याच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडते. साहित्यात स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांसह विचारांचे वास्तव आणि शब्दांचे वैभवही असते. बंधुतेचा धागा समाजाला बांधण्याचे काम करतो. त्यात माणसांना जोडण्याची आणि माणूस म्हणून घडविण्याची ताकद असते,” असे प्रतिपादन माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी यांच्या संयुक्तपणे भोसरी येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालयातील भगवान महावीर सभागृहात आयोजिलेल्या बाविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या समारोपात प्रा. ढोबळे बोलत होते. यावेळी प्रा. ढोबळे व वंचित विकास संस्थेला ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा. ढोबळे यांनी पुरस्काराच्या रकमेत पाच हजारांची भर घालून वंचित विकास संस्थेला दहा हजारांची देणगी दिली.
यावेळी राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी चंद्रकांत वानखेडे, स्वागताध्यक्ष डॉ. अशोक कुमार पगारिया, परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रकाश जवळकर, वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, निमंत्रक रामदास जैद व प्राचार्य सदाशिव कांबळे, प्रशांत रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. साने गुरुजी मुल्यजागर पुरस्कारांचेही वितरण यावेळी झाले.
प्रा. लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, “विचारांचे वास्तव आणि शब्दांचे वैभव जपल्यास समाजात सामाजिक परिवर्तन घडेल. समाजातील वेदनेचा हुंकार कागदावर उतरला पाहिजे. कविता जिवंत आणि सकस असावी. सामर्थ्यशाली लिखाणातुन लेखकांनी क्रांती घडवली, याचा इतिहासही साक्षीदार आहे. सध्या वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे. त्यामुळे साहित्याचे गांभीर्य लक्षात घेत मराठीचे वैभव आता साहित्यिकांनी वाढवले पाहिजे.”
प्रकाश रोकडे म्हणाले, “बंधुतेचा व मानवतेचा विचार जगत असलेल्या प्रा. ढोबळे आणि वंचित विकास संस्थेला बंधुता पुरस्काराने सन्मानित करताना आनंद होत आहे. हे व्यासपीठ यापुढेही समाजात बंधुतेचा विचार पेरण्यासाठी तत्पर आहे.”
विजयकुमार मर्लेचा म्हणाले, “आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केलेल्या विलास चाफेकर यांचा हा सन्मान आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच सामाजिक विचारांचा वसा जोपासत वंचित विकास संस्था वंचितांसाठी कार्यरत आहे.”
शंकर आथरे यांनी सुत्रसंचालन केले. सदाशिव कांबळे यांनी आभार व्यक्त केले.

Tags: Laxmanrao DhobleRashtriya Bandhutva awardRashtriya Bandhutva Sahitya AwardVanchit vikas sansthaराष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदलक्ष्मणराव ढोबळे
Previous Post

मागास अधिकाऱ्यांची फेर जातपडताळणी करा!

Next Post

मलिक म्हणतात, ‘प्रामाणिक’ वानखेडेंचे कपडे, बूट लाखो रुपयांचे! वानखेडेंचा लोखंडवाला मार्केटमध्ये तपासण्याचा सल्ला!

Next Post
malik alligation on wankhede lifestyle

मलिक म्हणतात, 'प्रामाणिक' वानखेडेंचे कपडे, बूट लाखो रुपयांचे! वानखेडेंचा लोखंडवाला मार्केटमध्ये तपासण्याचा सल्ला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!