Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मागास अधिकाऱ्यांची फेर जातपडताळणी करा!

मुख्यमंत्र्यांकडे आंबेडकरी लोक संग्रामची मागणी

November 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
mantralay

मुक्तपीठ टीम 

नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो ( एनसीबी)चे संचालक समीर वानखेडे यांच्या जात- धर्माचे गौडबंगाल आणि जात पडताळणीच्या एका ‘करोडपती’ उपायुक्ताला दोन लाखांची लाच घेताना अलीकडेच झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर ‘एमपीएससी’मार्फत सेवेत आलेल्या मागासवर्गीय अधिकाऱ्यांची फेर जातपडताळणी करण्यात यावी, त्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ आयएएस,आयपीएस अधिकारी आणि मागास समाजातील नामवंतांचा समावेश असलेली उच्च स्तरीय समिती स्थापन करावी, अशी मागणी ‘आंबेडकरी लोक संग्राम’ चे अध्यक्ष प्रा डॉ जी के डोंगरगावकर आणि सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी आज केली.

 

या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक निवेदन सादर करण्यात आले असून त्याच्या प्रती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही सादर करण्यात आल्या आहेत. दलित अत्याचार, अनुशेष, पदोन्नती, विशेष घटक योजना निधीचा पुरेपूर वापर या मुद्द्यांवर नोकरशाहीच्या दिसणाऱ्या उदासीनतेला बोगस मागास अधिकाऱ्यांची प्रशासनात झालेली मोठी घुसखोरीच कारणीभूत आहे, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला आहे.

 

 

हजारोंनी टाळली जातपडताळणी

महाराष्ट्रात जात पडताळणी कायदा २००० सालात अंमलात आला. त्यानंतरही गेल्या २० वर्षात जात पडताळणी टाळून दिमाखात नोकरी करत असलेल्या एमपीएससीमार्फत सेवेत आलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांची संख्या हजारोच्या घरात आहे. त्यातील अनेक अधिकारी पदोन्नतीने आयएएसचा दर्जा मिळवून सन्मानाने निवृत्त होत आहेत. खऱ्या मागासांची संधी हिरावून घेत त्यांच्यावर होत असलेला अन्याय रोखण्यासाठी सेवेतील मागास अधिकाऱ्यांची फेर जात पडताळणी हाती घेण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

जी आर धाब्यावर

जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करता सेवा करत असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे, असा एक जी आर राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी काढला आहे. पण नोकरशाहीने तो जी आर धाब्यावर बसवल्यामुळे घुसखोर नकली मागास अधिकाऱ्यांचे फावले आहे, असे डॉ डोंगरगावकर आणि शेजवळ यांनी सांगितले.

 

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्या सरकारने तर अशा प्रकरणांमध्ये बोगस मागास अधिकारी- कर्मचाऱ्यांना कारवाईवर स्थगिती आणण्याची संधी मिळू नये, यासाठी उच्च न्यायालयात आधीच कॅव्हिएट दाखल करा, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

 

लाचखोरी मोडून काढा

  • अनुसूचित जाती- जमातींना संविधानिक सवलतींचा लाभ मिळण्यासाठी दिल्या जाणाऱ्याप्रमाणपत्रांपैकी सुमारे २५ टक्के प्रमाणपत्रे बोगस असतात, असे निरीक्षण खुद्द सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच नोंदवलेले आहे.
  • त्यामुळे राज्य सरकारने जात पडताळणी कार्यालयांमध्ये चालणारी लाचखोरी कठोरपणे मोडून काढावी, अशी मागणीही आंबेडकरी लोक संग्रामने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Tags: Ambedkar lok sangramcm bhupesh baghelcm uddhav thackeraydwakar shejwalNCBProf. Dr. K. Dongargaonkarआंबेडकरी लोक संग्रामउद्धव ठाकरेजी के डोंगरगावकरदिवाकर शेजवळनार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोभुपेश बघेलमहाराष्ट्र
Previous Post

शिवाजी पार्कवर राहुल गांधींची सभा! २८ डिसेंबर २००३च्या सोनिया गांधीच्या सभेनंतरचा फायदा काँग्रेसला मिळणार?

Next Post

साहित्यात सामाजिक परिवर्तन करण्याची क्षमता – प्रा. लक्ष्मणराव ढोबळे

Next Post
लक्ष्मणराव ढोबळे

साहित्यात सामाजिक परिवर्तन करण्याची क्षमता - प्रा. लक्ष्मणराव ढोबळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!