Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मलिक म्हणतात, ‘प्रामाणिक’ वानखेडेंचे कपडे, बूट लाखो रुपयांचे! वानखेडेंचा लोखंडवाला मार्केटमध्ये तपासण्याचा सल्ला!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
malik alligation on wankhede lifestyle

मुक्तपीठ टीम

आतापर्यंत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंच्या जात आणि धर्मावरुन आरोप केले होते. मंगळवारी त्यांनी समीर वानखेडेंच्या पॉश राहणीमानावर आरोप केला आहे. समीर वानखेडे इतके प्रामाणिक अधिकारी आहे की, त्याच्या शर्टची किंमत ७० हजार रुपये आहे. ते दोन लाखांचे बूट आणि वीस लाखांचे घड्याळ वापरतात. त्यांचा बेल्ट आणि पँटही लाखोंच्या घरात आहे. त्यांनी एकदा घातलेला शर्ट पुन्हा ते कधीच घालत नाही. देशातील सर्व अधिकारी असेच प्रामाणिक झाले तर देशाचा चेहरामोहरा बदलेल, असेही ते म्हणाले. यावर आता समीर वानखेडें यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

 

दोन लाखांचे बूट, वीस लाखांचं घड्याळ, मलिकांचा आरोप

  • समीर वानखेडे अतिशय प्रामाणिक अधिकारी असल्याचं काही जण म्हणतात.
  • मात्र गेल्या महिन्याभरात त्यांनी वापरलेल्यांची कपड्यांची किंमत ५ ते १० कोटी रुपयांच्या घरात आहे.
  • वानखेडे कधीही त्यांचे कपडे रिपीट करत नाहीत.
  • दररोज ते नवीन कपड़े वापरतात.
  • समीर वानखेडेंनी गेल्या महिन्याभरात ५ ते १० कोटींचे कपडे वापरले आहेत.
  • वानखेडे २ लाखांचे बूट, ७० हजारांचे शर्ट, ३० हजारांचे टी – शर्ट, १ लाखाची पँट वापरतात.
  • ते वापरत असलेल्या घड्याळ्यांची किंमत २० लाखांपासून १ कोटीपर्यंत आहे.
  • प्रामाणिक अधिकाऱ्याची ही जीवनशैली आहे.
  • सर्व प्रामाणिक व्यक्तींनी अशाच प्रकारचं जीवन जगता यावं.
  • राहणीमान आणि कपड्यांच्या बाबतीत वानखेडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनादेखील मागे टाकलं आहे.

 

वानखेडे यांना ८ कोटी देण्यात येणार होते

  • नवाब मलिक म्हणाले की, आर्यन खान प्रकरणात सॅम डिसूझा समोर आला आहे.
  • २५ कोटींचा सौदा झाल्याची कबुली त्यांनी स्वतः दिली आहे.
  • जी १८ कोटींवर सेटल होणार होती.
  • त्यापैकी आठ कोटी रुपये समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते.
  • फ्लेचर पटेल, किरण गोसावी, मनीष भानुशाली यांच्यावर आम्ही पहिल्या दिवसापासून प्रश्न उपस्थित केले होते.
  • पण प्रत्येक वेळी सत्यमेव जयते बोलून पळून चालणार नाही.
  • फसवणुकीचा हा खेळ थांबला पाहिजे.
  • समीर वानखेडे यांनी एनसीबीमध्ये रुजू झाल्यानंतर स्वत:ची वेगळी फौज तयार करून खंडणीचे रॅकेट सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला.

वानखेडेंवर आरोप

  • नवाब मलिक म्हणाले की, समीर वानखेडेंनी सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि दीपिका पदुकोण यांना बनावट प्रकरणात बोलावले.
  • आजपर्यंत या प्रकरणी आरोपपत्र दाखल झालेले नाही, असे का?
  • या प्रकरणातून समीर वानखेडे यांनी हजारो कोटींची वसुली केल्याचे मलिक म्हणाले.
  • ही वसुली दुबई आणि मालदीवमध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले.
  • मी कधीच दुबईला गेलो नाही पण त्यांची बहिणी गेलेली.

 

मालदीवमध्ये जाणे सोपे नाही

  • नवाब मलिक म्हणाले की, मालदीवला जाणे इतके सोपे नाही, तेही संपूर्ण कुटुंबासह.
  • मालदीवमध्ये जाण्यासाठी ३० ते ३५ लाख रुपये खर्च येतो.
  • अशा स्थितीत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समीर वानखेडेंना मालदीव ट्रिपवर पाठवले का?
  • त्याचा खर्च नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केला होता का?

 

समीर वानखेडेंचं प्रत्युत्तर

  • समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांच्या या आरोपांवर सडेतोड उत्तर दिले आहे.
  • नवाब मलिकांनी जास्त लांब नाही फक्त अंधेरीच्या लोखंडवाला मार्केटमध्ये जा, तेथे, त्यांना सर्व ब्रँड आणि त्यांचे दर सापडतील.
  • माझ्या महागड्या कपड्यांची फक्त अफवा आहे.
  • मलिकांना याविषयी कमी माहिती आहे.
  • मलिकांनी खरी माहिती शोधून काढावी.

Tags: maldivesNawab MalikNCBSameer Wankhedeएनसीबीनवाब मलिकमालदीवसमीर वानखेडे
Previous Post

साहित्यात सामाजिक परिवर्तन करण्याची क्षमता – प्रा. लक्ष्मणराव ढोबळे

Next Post

महाराष्ट्राबाहेर लोकसभेत पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा फडकला!

Next Post
Shivsena Mp Kalaben Delkar Dadara Nagar Haveli

महाराष्ट्राबाहेर लोकसभेत पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा फडकला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!