मुक्तपीठ टीम
भारतीय स्मार्टफोन उत्पादक लावाकडून लवकरच पहिला 5G स्मार्टफोन बाजारात लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनचे फिचर्स आणि डिझाइन रेंडर्स ऑनलाइन लीक झाले आहेत. किंमत आणि फिचर्सची तुलना करता हा फोन इतर 5G फोनला टक्कर देण्याचा तयारीत आहे.
लावा अग्नी 5Gची भारतीय किंमत
- लावा अग्नी 5G फोन ०९ नोव्हेंबरला लॉन्च होणार आहे.
- लावा अग्नी 5G ची किंमत १९,९९० रुपये असेल.
- फोन 6GB आणि 8GB रॅमसह 128GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजसह उपलबध होण्याची शक्यता.
लावा अग्नी 5Gचे फिचर्स आणि डिझाइन
- लावा अग्नी 5G 90Hz डिस्प्लेसह येईल.
- डिस्प्लेच्या वरच्या मध्यभागी होल-पंच कटआउट असेल.
- फोन MediaTek Dimensity 810 SoC वरून पॉवर सप्लाय करेल.
- फोनमध्ये 5000mAh बॅटरी असेल.
- फोनला USB Type-C पोर्ट आहे.
- दोन्ही बाजूला 3.5mm हेडफोन जॅक आणि स्पीकर ग्रिल आहे.
कसा असणार लावाचा कॅमेरा?
- आयताकृती आकाराचा कॅमेरा मॉड्यूल आहे.
- फोनमध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे.
- फोनमध्ये अल्ट्रावाइड कॅमेरा आणि मॅक्रो/डेप्थ सेन्सर असण्याची अपेक्षा आहे.
- पॉवर बटणावर साइड-माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.
- फोन निळ्या रंगाच्या मॅट फिनिशींगमह उपलब्ध असेल. आणखी एक रंग पर्याय लॉन्च करण्याची शक्यता आहे.