Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयपीएलच्या बापाच्या उधळपट्टीचे किस्से! फिरायला विमानं, मर्सिडिझ एस क्लास कार, राहायला हॉटेलचा पूर्ण माळा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Lalit Modi

मुक्तपीठ टीम

भारतातीलच नाहीतर जगातील क्रिकेटमध्ये आयपीएलच्या गडगंज कमाईतून अर्थक्रांती घडवणारे ललित मोदी यांना नंतर ज्यामुळे फरार व्हावे लागले ते सारं आता उघड होत आहे. ‘मॅव्हरिक कमिश्नर: द आयपीएल – ललित मोदी सागा’ या पुस्तकात ललित मोदी आणि आयपीएलविषयी माहिती उघड झाली आहे. आयपीएल ब्रँड घडवणाऱ्या आयपीएलच्या या बापाच्या उधळपट्टीचे अनेक किस्से मांडण्यात आले आहेत.

ललित मोदींसाठी नेहमीचत मर्सिडीज एस-क्लास कारची व्यवस्था करावी लागत असे

ललित मोदींची श्रीमंती यावरून समजते की त्यांना धर्मशाळा आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये प्रवास करणाऱ्यासाठी मर्सिडीज एस-क्लास कारची व्यवस्था करावी लागत असे कारण, ही कार या शहरांमध्ये उपलब्ध नसायची त्यामुळे त्यांच्यासाठी या कारची व्ययवस्था आधीच करावी लागत असे आणि त्यांना दुसऱ्या कारमध्ये बसायला आवडायचे नाही.

ते पंचतारांकित हॉटेलमध्ये संपूर्ण मजला स्वत:साठी बुक करायचे आणि ते त्यांच्या स्वखर्चाने हे करायचे की बीसीसीआयच्या पैशाने, असा प्रश्न करण्याची हिंमत कुणालाही नव्हती यावरून त्याच्या उधळपट्टीचा अंदाज येतो.

‘मॅव्हरिक कमिशनर: द आयपीएल-ललित मोदी सागा’ या पुस्तकातील ललित मोदींची कहाणी

‘मॅव्हरिक कमिशनर: द आयपीएल-ललित मोदी सागा’ या पुस्तकात लेखक बोरिया मजुमदार यांनी दावा केला आहे की, ललित मोदी आयपीएल सामन्यासाठी धर्मशाळा येथे गेले होते, तेव्हा त्यांच्या कार्यालयाने दिल्लीहून त्यांच्यासाठी मर्सिडीज एस-क्लास कार पाठवल्या होत्या. विमानातून उतरण्यापूर्वी या गाड्या धर्मशाळेत पोहोचल्या होत्या. मजुमदार यांनी आणखी एका घटनेबद्दल सांगितले आहे की, मे २०१० मध्ये मोदी देश सोडून गेले तेव्हा एका हॉटेलने बीसीसीआयला देय असलेली बिलाची रक्कम पाठवली आणि त्यानंतर बोर्डाने त्यांचे बिल भरण्यास नकार दिला. लेखकाच्या मते, ही काही उदाहरणे आहेत जी दर्शवतात की बरेच लोक आयपीएलचा तिरस्कार का करत आहेत.

पुस्तकात दावा करण्यात आला आहे की, क्रिकेटची ब्रँड व्हॅल्यू वाढत असूनही, त्यातील ग्लॅमर आणि ऐश्वर्य यांचे अश्लील प्रदर्शन नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेते. लेखकाच्या मते, ललित स्वत: त्याच्या यश पाठी खेचण्यासाठी दोषी आहेत. आयपीएलच्या पहिल्या दोन सीझनच्या यशानंतर ते आपला छंद पूर्ण करण्यात अनावश्यक खर्च करत होते.


Tags: IPL CricketLalit ModiMaverick Commissioner: The IPL-Lalit Modi SagamuktpeethWriter Boria Majumdarआयपीएल क्रिकेटघडलं-बिघडलंमुक्तपीठमॅव्हरिक कमिशनर: द आयपीएल-ललित मोदी सागाललित मोदीलेखक बोरिया मजुमदार
Previous Post

“गुलाबरावांची बाप बदलण्याची भाषा, मिठी मारून रडणारे लांडे, वारंवार निधी नेणारे भुमरे!” शिवसेनेकडून बदललेल्या रंगांकडे बोट!

Next Post

३८ आमदारांनी पाठिंबा काढला, शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयात दावा! वाचा याचिका जशी आहे तशी…

Next Post
Eknath SHinde Petition

३८ आमदारांनी पाठिंबा काढला, शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयात दावा! वाचा याचिका जशी आहे तशी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!