मुक्तपीठ टीम
भारतातीलच नाहीतर जगातील क्रिकेटमध्ये आयपीएलच्या गडगंज कमाईतून अर्थक्रांती घडवणारे ललित मोदी यांना नंतर ज्यामुळे फरार व्हावे लागले ते सारं आता उघड होत आहे. ‘मॅव्हरिक कमिश्नर: द आयपीएल – ललित मोदी सागा’ या पुस्तकात ललित मोदी आणि आयपीएलविषयी माहिती उघड झाली आहे. आयपीएल ब्रँड घडवणाऱ्या आयपीएलच्या या बापाच्या उधळपट्टीचे अनेक किस्से मांडण्यात आले आहेत.
ललित मोदींसाठी नेहमीचत मर्सिडीज एस-क्लास कारची व्यवस्था करावी लागत असे
ललित मोदींची श्रीमंती यावरून समजते की त्यांना धर्मशाळा आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये प्रवास करणाऱ्यासाठी मर्सिडीज एस-क्लास कारची व्यवस्था करावी लागत असे कारण, ही कार या शहरांमध्ये उपलब्ध नसायची त्यामुळे त्यांच्यासाठी या कारची व्ययवस्था आधीच करावी लागत असे आणि त्यांना दुसऱ्या कारमध्ये बसायला आवडायचे नाही.
ते पंचतारांकित हॉटेलमध्ये संपूर्ण मजला स्वत:साठी बुक करायचे आणि ते त्यांच्या स्वखर्चाने हे करायचे की बीसीसीआयच्या पैशाने, असा प्रश्न करण्याची हिंमत कुणालाही नव्हती यावरून त्याच्या उधळपट्टीचा अंदाज येतो.
‘मॅव्हरिक कमिशनर: द आयपीएल-ललित मोदी सागा’ या पुस्तकातील ललित मोदींची कहाणी
‘मॅव्हरिक कमिशनर: द आयपीएल-ललित मोदी सागा’ या पुस्तकात लेखक बोरिया मजुमदार यांनी दावा केला आहे की, ललित मोदी आयपीएल सामन्यासाठी धर्मशाळा येथे गेले होते, तेव्हा त्यांच्या कार्यालयाने दिल्लीहून त्यांच्यासाठी मर्सिडीज एस-क्लास कार पाठवल्या होत्या. विमानातून उतरण्यापूर्वी या गाड्या धर्मशाळेत पोहोचल्या होत्या. मजुमदार यांनी आणखी एका घटनेबद्दल सांगितले आहे की, मे २०१० मध्ये मोदी देश सोडून गेले तेव्हा एका हॉटेलने बीसीसीआयला देय असलेली बिलाची रक्कम पाठवली आणि त्यानंतर बोर्डाने त्यांचे बिल भरण्यास नकार दिला. लेखकाच्या मते, ही काही उदाहरणे आहेत जी दर्शवतात की बरेच लोक आयपीएलचा तिरस्कार का करत आहेत.
पुस्तकात दावा करण्यात आला आहे की, क्रिकेटची ब्रँड व्हॅल्यू वाढत असूनही, त्यातील ग्लॅमर आणि ऐश्वर्य यांचे अश्लील प्रदर्शन नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेते. लेखकाच्या मते, ललित स्वत: त्याच्या यश पाठी खेचण्यासाठी दोषी आहेत. आयपीएलच्या पहिल्या दोन सीझनच्या यशानंतर ते आपला छंद पूर्ण करण्यात अनावश्यक खर्च करत होते.