मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचाराची पुनरावृत्ती हरियाणातील अंबाला जिल्ह्यातील नारायणगढमध्ये दिसून आली आहे. कुरुक्षेत्रातील भाजपचे खासदार नायबसिंह सैनी यांच्या ताफ्यातील गाडीने काळे झेंडे दाखवत असणाऱ्या एका शेतकऱ्याला धडक दिली आहे. जखमी शेतकऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी नारायणगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अशा परिस्थितीत सुरक्षेसाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
खासदाराच्या नावे गाडी नोंदणीकृत
- खासदार नायबसिंह सैनी नारायणगढ येथील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते.
- त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच शेतकरी निषेध करण्यासाठी पोहोचले.
- असे म्हटले जात आहे की कार्यक्रमानंतर, जेव्हा सैनी आपल्या ताफ्यासह निघाले, तेव्हा भवनप्रीत अचानक रस्त्यावर आले.
- त्यानंतर खासदारांच्या ताफ्याची गाडी त्याच्यांशी धडकली.
- शेतकरी नेत्यांचा असा दावा आहे की, भावनप्रीतला धडक देणारी इनोव्हा कार (HR04F0976) खासदार नायबसिंह सैनी यांच्या नावाने नोंदणीकृत आहे.
शेतकऱ्यांची खासदार आणि चालकाविरोधात तक्रार
- घटनेनंतर शेतकऱ्यांनी त्याचा चालक राजीव याच्या विरोधात नारायणगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
- भारतीय किसान युनियन चढूनी गटाने तक्रारीत म्हटले आहे की, शेतकरी कृषी कायद्यांचा विरोध करत हातात काळे झेंडे घेऊन तो रस्त्याच्या कडेला उभे होते.
- दरम्यान खासदारांच्या ताफ्याच्या गाडीच्या चालकाने त्याला मुद्दाम धडक दिली.
- ही गाडी केवळ खासदारांच्या नावाने नोंदणीकृत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांचा पोलिसांना १० ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम
- १० ऑक्टोबरपर्यंत पोलिसांनी या प्रकरणी कारवाई न केल्यास पोलीस ठाण्याचे घेराव घालण्यात येईल, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
- त्याचबरोबर पोलिसांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे.