Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जाणून घ्या कोण आहेत पराग अग्रवाल आणि विजया गाडे, दोघे का ठरले मस्कचे लक्ष्य?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Twitter

मुक्तपीठ टीम

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आता ट्विटरचे नवे मालक बनले आहेत आणि त्यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेताच कंपनीतील उच्च पदांवर असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल आणि कंपनीच्या कायदेशीर, धोरण आणि सुरक्षा समस्यांच्या प्रमुख विजया गाडे यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मात्र उच्च पदांवर असलेले हे भारतीय अधिकारी एलॉन मस्क यांच्या निशाण्यावर का होते, याची कारणं महत्वाची आहेत.

पराग अग्रवाल का मस्क यांच्या निशाण्यावर?

  • एलॉन मस्क यांनी पराग अग्रवाल यांच्यावर आरोप केला आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट खात्यांच्या संख्येबद्दल माझी आणि ट्विटरच्या गुंतवणूकदारांची पूर्णपणे दिशाभूल केली आहे.
  • एलॉन मस्कचा ट्विटरसोबतचा करार पूर्ण झाला तेव्हा पराग अग्रवाल आणि नेड सेगल देखील ट्विटरच्या कार्यालयात उपस्थित होते आणि करार झाल्यानंतर या दोन्ही उच्च अधिकाऱ्यांना ट्विटरच्या मुख्यालयातून हाकलून देण्यात आले होते.
  • तथापि, ट्विटर, एलॉन मस्क किंवा कोणत्याही अधिकाऱ्याकडून या संदर्भात कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

पराग अग्रवाल राजस्थानचे रहिवासी

  • भारतीय वंशाचे सॉफ्टवेअर अभियंता पराग अग्रवाल हे राजस्थानचे आहेत आणि त्यांनी २९ नोव्हेंबर २०२१ रोजी ट्विटरचे नवीन सीईओ म्हणून पदभार स्वीकारला.
  • पराग अग्रवाल यांचा जन्म २१ मे १९८४ रोजी बारमेर जिल्ह्यात झाला.
  • पराग यांचे वडील राम गोपाल अग्रवाल २०११ मध्ये BARC मधून निवृत्त झाले होते, तर आई शशी या प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्या आहेत.
  • परागची बहीण कुणाल वॉशिंग्टन विद्यापीठात फॅकल्टी मेंबर आहे आणि त्याची पत्नी विनिता अग्रवाल स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये प्राध्यापक आहे.
  • पराग अग्रवालचे आई-वडील सध्या मुंबईत राहतात, पराग अग्रवाल पत्नी आणि एका मुलासह अमेरिकेत राहतात.
  • पराग अग्रवाल यांनी २००५ मध्ये आयआयटी मुंबईतून बीटेक केले आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातून संगणक विज्ञानात पीएचडी केली.
  • ट्विटरचे सीईओ होण्यापूर्वी पराग यांनी ट्विटरवर ११ वर्षे काम केले.

विजया गाडे या व्यवसायाने वकील आहेत, त्यामुळे एलॉन मस्क यांच्या निशाण्यावर

  • पराग अग्रवाल यांच्यासह अन्य उच्चपदस्थ अधिकारी विजया गाडे यांनाही एलॉन मस्क यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
  • विजया गाडे यांनी २०११ मध्ये ट्विटर जॉईन केले आणि कंपनीचे धोरण, कायदेशीर आणि सुरक्षा समस्या यासारख्या सर्व महत्त्वाच्या विभागांचे काम पाहिले.
  • अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये विजया गाडे यांचे ट्विटरचे ‘नैतिक अधिकार’ म्हणून वर्णन करण्यात आले आहे.
  • एलॉन मस्क आणि ट्विटर यांच्यात झालेल्या डीलमध्ये विजया गाडे यांची प्रमुख भूमिका होती.
  • २०१४ मध्ये फॉर्च्युनने ट्विटरच्या कार्यकारी टीममध्ये ‘सर्वात शक्तिशाली महिला’ म्हणून त्यांचे वर्णन केले होते यावरून त्याचा प्रभाव ओळखला जातो.
  • मस्क यांना ट्विटर व्यवहारातील दांडगाई रोखण्यात विजया गाडे यांची रणनीतीही प्रभावी ठरली.
  • विजया गाडे यांनीच अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
  • एलॉन मस्क आणि विजया गाडे यांच्यात कायदेशीर मुद्द्यांवर काही मतभेद होते, त्यामुळे त्यांनाही ट्विटरमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

Tags: elon muskParag AgarwaltwitterVijaya Gaddeएलॉन मस्कट्विटरपराग अग्रवालविजया गाडे
Previous Post

तंत्रभ्रष्ट: लाचखाऊ अधिकाऱ्याची क्रिप्टोकरन्सीत कोट्यवधीची गुंतवणूक!

Next Post

मारूतीनं रिकॉल केल्या ९ हजार २५ गाड्या! त्यात तुमची कार तर नाही?

Next Post
Maruti Suzuki Car Recall

मारूतीनं रिकॉल केल्या ९ हजार २५ गाड्या! त्यात तुमची कार तर नाही?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!