Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लखीमपूर खिरीमधील मयत दलित मुलींच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी घेतली भेट

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ramdas Athwale

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेशातील लाखीमपूर खीरी मधील दोन अल्पवयीन दलित बहिणींची सामूहिक बलात्कार  करून निर्घृण हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. त्या  निषेधार्ह प्रकरणातील मयत दलित बहिणींच्या कुटुंबियांची लखीमपूर खिरी जिल्ह्यातील तामोली पूर्वाच्या लालपूर मजरा गावातील राहत्या घरी जाऊन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  मयत मुलींच्या शोकाकुल कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी पीडीत मयत मुलींचे भाऊ वडील आणि आई उपस्थित होते.या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने त्यांचे सांत्वन करीत धीर देण्याचे आणि या प्रकरणातील गुन्हेगारांना  फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फासावर लटकविण्यासाठी प्रयत्न सरकार  करीत असल्याचे  आश्वासन रामदास आठवले यांनी दिले.

 

लखीमपूर खीरी मधील दोन अल्पवयीन दलित बहिणींची सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता.त्या निषेधार्ह प्रकरणातील मयत दलित बहिणींच्या कुटुंबियांची लखीमपूर खिरी तामोली पूर्वाच्या लालपूर मजरा गावामधील घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली pic.twitter.com/bDPORHGj8n

— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 23, 2022

मयत दलित मुलींच्या कुटुंबाला सामाजिक न्याय मंत्रालय तर्फे अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार १६ लाख ५० हजार देण्यात येत असल्याची घोषणा रामदास आठवले यांनी केली. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या वतीने राज्य सरकार तर्फे पीडित मयत मुलीच्या कुटुंबाला 1 एकर जमिनीचा पट्टा आणि २५ लाख रुपये सांत्वनपर निधी देण्यात येणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.

लखीमपूर खिरी तील लालपूर मजरा तामोळी पूर्वा गावातील दलित समाजाच्या दोन अल्पवयीन सख्या बहिणींना नराधम तरुणांनी घरातून बोलावून नेले.त्या मुलींच्या आईने ते पहिले होते.दिवसा दुपारी ३ वाजता त्या मुलींना नेऊन सामूहिक अत्याचार करून गळा दाबून त्या मुलींची हत्या करण्यात आली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या अत्याचार आणि खून प्रकरणात पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली आहे.मात्र गावातील लोकांची साक्ष घेतली पाहिजे. दिवसाढवळ्या हा  प्रकार घडला असल्याने गावातील लोकांनी कुणातरी या नराधम तरुणांना जतायेता पाहिले असेल.त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास करून सखोल चौकशी करून साक्षीदारांची साक्ष नोंदवावी. लवकरात लवकर पोलिसांनी चार्जशीट न्यायालयात दाखल करावे.या प्रकरणी खटला जलद गती न्यायालयात चालवून तीन महिन्यात निकाल लावून नराधम गुन्हेगारांना फाशीची कठोर शिक्षा करावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता सोबत होते.


Tags: Dalit GirlsLakhimPur Khiriunion Minister Ramdas Athwaleकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेमयत दलित मुलीलखीमपूर खिरी
Previous Post

महिमा नवरात्रौत्सवाचा…जाणून घ्या महत्वाची माहिती!

Next Post

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा | २६ सप्टेंबर

Next Post
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा | २६ सप्टेंबर

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा | २६ सप्टेंबर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!