Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कृषी क्षेत्रातही आहे करिअर…जाणून घ्या पुढील पर्याय…

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Farming

मुक्तपीठ टीम

शेतकरी, संपूर्ण जगाचा अन्नदाता. ग्रामीण भागातून लोक प्रगतीच्या दिशेने वळून शहरात स्थायिक झाले. आजच्या काळात शहरात राहणाऱ्यांना गावची ओढ राहिलेली नाही. सर्वांना करिअर करायचे आहे पण, शेती कोणाला नको. परंतु, कृषी क्षेत्रातही एक उत्तम करिअर घडवता येते. कृषी क्षेत्र अर्थात ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये विविध व्यवसाय करता येतात.

कृषी व्यवसाय हे शेतीवर आधारित एक विस्तृत क्षेत्र आहे, ज्यामध्ये अन्नधान्याचे उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, विपणन, व्यवस्थापन, वित्त इत्यादींचा समावेश होतो आणि यामध्ये कृषी-व्यवसाय व्यवस्थापनातील व्यावसायिक महत्त्वाची भूमिका बजावतात. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि बाजारातील गतिशीलता यामुळे कृषी क्षेत्र मोठ्या बदलासाठी सज्ज आहे. अनेक खासगी आणि सार्वजनिक कंपन्या या क्षेत्रात येत असून कृषी व्यवसायाकडे करिअरच्या दृष्टीने अतिशय चांगले क्षेत्र म्हणून पाहिले जात आहे.

कृषी क्षेत्रातील करिअर संधीविषयी सविस्तर माहिती…

  • कृषी-व्यवसाय संशोधन, व्यवस्थापन आणि पॅकेजिंगसह इतर अनेक पर्यायांसह वाढीच्या संधी देते.
  • कृषी बाजार आणि खाद्यपदार्थ जसे की, फळे, भाजीपाला यांची साठवणूक, दुग्धव्यवसायाचा विस्तार आणि शेतीमध्ये तंत्र आणि तंत्रज्ञानाचा समावेश यामुळे कृषी व्यवसायात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत.
  • कृषी-व्यवसाय पदवी अनेक मार्ग उघडते. शेती, किरकोळ विपणन, अन्न प्रक्रिया, अन्न उत्पादन इत्यादींपैकी कोणताही पर्याय निवडू शकता.
  • या क्षेत्रात कृषी-व्यवसाय अन्न व्यवस्थापक, कृषी-व्यवसाय विपणन समन्वयक, कृषी-व्यवसाय कार्यालय सहाय्यक, कृषी विश्लेषक, फार्म व्यवस्थापक, पीक उत्पादक, बाजार विश्लेषक, गुणवत्ता नियंत्रक म्हणून नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.
  • नॅशनल बँक ऑफ अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड), फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड आणि कृषी मंत्रालय इत्यादीसारख्या सरकारी क्षेत्रातही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

कृषी-व्यवसाय क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता

  • कृषी-व्यवसाय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी विज्ञान शाखेतून बारावीनंतर कृषी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा.
  • कृषी विषयात बॅचलर पदवी अभ्यासक्रम केल्यानंतर तुम्ही चांगल्या संस्थेतून कृषी व्यवसायात मास्टर्स, एमबीए, पीजीडी, पीजीडीएम करू शकता आणि या क्षेत्रात उत्तम करिअर करू शकता.
  • नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ अॅग्रीकल्चरल एक्सटेंशन मॅनेजमेंट हैदराबाद येथे पीजीडीएम करू इच्छिणाऱ्यांनी अर्ज कसा करावा?
  • नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ अॅग्रीकल्चरल एक्सटेंशन मॅनेजमेंट हैदराबाद येथे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंटसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह बॅचलर पदवी यासोबतच CAT-2022 चा वैध स्कोअर असणे आवश्यक आहे.
  • इच्छुक उमेदवार संस्थेच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी https://www.manage.gov.in/abm-admissions/admissions.asp या वेबसाइटवरून माहिती मिळवू शकतात.

Tags: AgribusinessAgriculture SectorcareerFarmerFarminggood newsmuktpeethकरिअरकृषी क्षेत्रकृषी व्यवसायचांगली बातमीमुक्तपीठशेतकरीशेतीॲग्रिकल्चर सेक्टर
Previous Post

गेल्या १४ महिन्यात सीएनजीचे दर ७३ टक्के भडकले! पेट्रोलशी स्पर्धा!!

Next Post

लोकसभेचं कामकाज पाहायचंय? जाणून घ्या नियम…

Next Post
Lok Sabha

लोकसभेचं कामकाज पाहायचंय? जाणून घ्या नियम...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!