Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गेल्या १४ महिन्यात सीएनजीचे दर ७३ टक्के भडकले! पेट्रोलशी स्पर्धा!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
CNG

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा सीएनजी महाग झाला आहे. सीएनजीची नवीन किंमत ७९.५६ रुपये प्रती-किलोग्रॅम झाली आहे. नवीन दर १७ डिसेंबर २०२२ म्हणजेच आज सकाळी ६ वाजल्यापासून लागू झाले आहेत. दिल्लीत सीएनजी ७८.६१ रुपये किलोग्रॅम दराने विकला जात होता, त्यात ९५ पैशांची वाढ झाली आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजीची किंमत ८२.१२ रुपये किलोग्रॅम झाली आहे, तर गुरुग्राममध्ये ती ८७.८९ रुपये किलोग्रॅम झाली आहे. गेल्या काही महिन्यांत सीएनजी आणि पीएनजीच्या जरात वाढही झाली होती.

दिल्ली आणि गुरुग्राममध्ये सीएनजीच्या किंमतीत आठ रुपयांचा फरक!

  • दिल्ली आणि गुरुग्राममध्ये सीएनजीच्या दरात सुमारे आठ रुपयांचा फरक आहे.
  • गेल्या एका वर्षात राष्ट्रीय राजधानी आणि आसपासच्या भागात सीएनजीच्या किंमती ७० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत.
  • दिल्लीतील पूर्वीची सीएनजी किंमत ८ ऑक्टोबर २०२२ रोजी बदलली होती.
  • त्या काळात किलोग्रॅममागे तीन रुपयांनी वाढ झाली होती.
  • ऑक्टोबर महिन्यात, गुरुग्राममध्ये सीएनजी ८६.९४ रुपये प्रति किलो होता.
  • नोएडा आणि गाझियाबादमध्ये ८१.१७ रुपये किलोग्रॅम होता.

एका वर्षात सीएनजी किती महागला?

  • गेल्या वर्षभरात सीएनजी सुमारे ७३ टक्क्यांनी महागला आहे.
  • १ ऑक्टोबर २०२२ रोजी सीएनजी ४५.५ रुपये किलोग्रॅम दराने विकला जात होता.
  • १७ डिसेंबर २०२२ रोजी सीएनजी ७९.५६ रुपये किलोग्रॅम झाला आहे.
  • गेल्या १४ महिन्यांत सीएनजी प्रति-किलोग्रॅम ३४.०६ रुपयांनी महागला आहे.
  • दरवाढीमुळे व्यावसायिक वाहनधारक तसेच खासगी सीएनजी वाहनधारक नाराज झाले आहेत.

पीएनजीच्या किंमतीत ९१% वाढ!

  • ऑक्टोबरमध्ये, आयजीएलने घरगुती स्वयंपाकासाठी पीएनजीचा दर दिल्लीत ५०.५९ रुपये प्रति स्कीम वरून ५३.५९ रुपये प्रति मानक घनमीटर केला होता.
  • ऑगस्ट २०२१ पासून पीएनजी दरांमध्ये झालेली ही १०वी वाढ होती.
  • किंमती २९.९३ रुपये प्रति SCM किंवा सुमारे ९१ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
  • नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राम तसेच उत्तर प्रदेशातील कानपूर आणि राजस्थानमधील अजमेरसारख्या इतर शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढवण्यात आल्याचे आयजीएलने त्यावेळी सांगितले होते.
  • पीएनजीच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या घरच्या बजेटवरही परिणाम झाला आहे.

सीएनजी आणि पीएनजीच्या वाढत्या किंमतीमागचे कारण काय?

  • गेल्या एका वर्षात सीएनजी ७० टक्क्यांनी महाग झाला आहे.
  • या वर्षी नैसर्गिक वायूच्या किंमतीत झालेली विक्रमी वाढ हे त्याचे प्रमुख कारण आहे.
  • त्यामुळे सीएनजी आणि पीएनजी दिवसेंदिवस महाग होत आहेत.
  • रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता यांच्या दरम्यान जागतिक बाजारपेठेत नैसर्गिक वायूच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.
  • आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रशिया हा नैसर्गिक वायूचा मुख्य पुरवठादार आहे.
  • सीएनजीच्या सातत्याने वाढणाऱ्या किंमती पाहता आता त्याचा वापर कमी होताना दिसत आहे.
  • किंमती वाढल्यानंतर फक्त ९ ते १० टक्के वाहने सीएनजी वापरत आहेत.
  • पूर्वी जवळपास १६ टक्के वाहने सीएनजीवर चालत होती.
  • डिझेल आणि सीएनजीच्या किंमतीत फारच कमी फरक असल्याने लोक आता सीएनजी वाहनांपेक्षा डिझेलवर चालणारी वाहने वापरण्यास प्राधान्य देत आहेत.

समितीची सीएनजी स्वस्त ठेवण्याची सूचना!!

  • गॅसच्या किंमतींशी संबंधित, किरीट पारीख समितीने सीएनजीवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची शिफारस सरकारला केली होती.
  • नैसर्गिक वायूच्या किंमती जीएसटीच्या कक्षेत येईपर्यंत सरकारने सीएनजीवर उत्पादन शुल्क आकारणे थांबवावे
  • त्यामुळे गॅसच्या वाढत्या किंमतींपासून जनतेला दिलासा मिळणार आहे.

Tags: CNGCNG priceCNG Price Hikedelhi
Previous Post

मोदींविरोधात गरळ ओकून आजोबा, आईची भारतद्वेषाची परंपरा पुढे चालवणारे बिलावल भुत्तो आहेत तरी कोण?

Next Post

कृषी क्षेत्रातही आहे करिअर…जाणून घ्या पुढील पर्याय…

Next Post
Farming

कृषी क्षेत्रातही आहे करिअर...जाणून घ्या पुढील पर्याय...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!