Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

साकीनाका पीडितेच्या मृत्यूनंतर संताप! एवढी क्रूरता कशी? महापौरांचा सवाल! नवाब मलिक, भाई जगतापांची जलदगती न्यायालयाची मागणी!

पीडित महिला नराधमाबरोबरच राहत होती, अशी पीडितेच्या आईची महापौरांना माहिती

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kishori pednekar

मुक्तपीठ टीम

साकीनाक्यातील महिलेवरील अमानुष अत्याचाराची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी साकीनाक्याच्या पीडितेचा मृत्यू होण्यापूर्वी रुग्णालयात जाऊन या महिलेच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्या महिलेवर झालेल्या अत्याचारांबद्दल दु:ख व्यक्त करतानाच किशोरीताईंनी एवढी क्रुरता येते तरी कशी? असा सवाल केला. मात्र, यामुळे मुंबई असुरक्षित झाली असं म्हणता येणार नाही, असेही त्या म्हणाल्या. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी या अत्याचारांविरोधात संताप व्यक्त करतानाच नराधमाविरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी केली.

 

महापौरांनी दिलेली माहिती वेगळीच…

  • महापौरांनी रुग्णालयात पीडितेच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली.
  • पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेली माहिती त्यांनी माध्यमांसमोर मांडली.
  • या महिलेला अमानूषपणे मारहाण करण्यात आली आहे.
  • ही महिला १० ते १२ वर्षापासून त्या पुरुषाबरोबर राहत होती.
  • त्याच्यासोबत तिचे सातत्याने भांडण होत असे, असं या महिलेच्या आईने सांगितल्याची माहितीही महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
  • त्यांच्यात भांडण सुरू होतं.
  • तो तिला मारहाण करत असल्याचं कळल्यावर स्थानिकांनी पोलिसांना कळवलं.
  • पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेऊन महिलेला रुग्णालयात दाखल केलं.
  • इतकी क्रूरता का येते?
  • मुंबई सुरक्षित आहे, असा दावाही त्यांनी केला.

 

हेही वाचा: चित्रा वाघांच्या डोळ्यात अश्रू आणि मुखी अंगार…ठाकरे-पवारांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही!!

 

जलदगती न्यायालयात खटला चालवू – नवाब मलिक

  • महिलेचा मृत्यू दुखद आहे.
  • लवकरात लवकर चार्जशीट दाखल करू.
  • जलदगती न्यायालयात खटला चालवू.
  • नराधमांच्या मनात भीती निर्माण होईल अशी शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

नराधमाला फाशीच द्या – भाई जगताप

  • एक आरोपी पकडला आहे.
  • मी पोलिसांशी बोललो.
  • निर्भया प्रकरणासारखीच ही घटना घडली आहे. मुंबई पोलिसांवर माझा विश्वास आहे.
  • पोलिसांनी लगेच आरोपीला अटक केली.
  • हा खटला जलदगती न्यायालयात चालवला पाहिजे. आरोपींना फाशीच झाली पाहिजे.

 

मुंबईच्या साकीनाका भागात अमानुष अत्याचार झालेल्या महिलेचा मृत्यू! संतापाचा भडका!!


Tags: bhai jagtapBMCkishori pednekarmumbai sakinaka caseNawab Malikकिशोरी पेडणेकरभाई जगतापमुंबई काँग्रेस
Previous Post

मुंबई तसेच ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण

Next Post

“साकीनाका घटनेचं राजकारण म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाणं”: संजय राऊत

Next Post
sanjay raut

"साकीनाका घटनेचं राजकारण म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाणं": संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!