मुक्तपीठ टीम
साकीनाक्यातील महिलेवरील अमानुष अत्याचाराची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी साकीनाक्याच्या पीडितेचा मृत्यू होण्यापूर्वी रुग्णालयात जाऊन या महिलेच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्या महिलेवर झालेल्या अत्याचारांबद्दल दु:ख व्यक्त करतानाच किशोरीताईंनी एवढी क्रुरता येते तरी कशी? असा सवाल केला. मात्र, यामुळे मुंबई असुरक्षित झाली असं म्हणता येणार नाही, असेही त्या म्हणाल्या. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी या अत्याचारांविरोधात संताप व्यक्त करतानाच नराधमाविरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी केली.
महापौरांनी दिलेली माहिती वेगळीच…
- महापौरांनी रुग्णालयात पीडितेच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली.
- पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेली माहिती त्यांनी माध्यमांसमोर मांडली.
- या महिलेला अमानूषपणे मारहाण करण्यात आली आहे.
- ही महिला १० ते १२ वर्षापासून त्या पुरुषाबरोबर राहत होती.
- त्याच्यासोबत तिचे सातत्याने भांडण होत असे, असं या महिलेच्या आईने सांगितल्याची माहितीही महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
- त्यांच्यात भांडण सुरू होतं.
- तो तिला मारहाण करत असल्याचं कळल्यावर स्थानिकांनी पोलिसांना कळवलं.
- पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेऊन महिलेला रुग्णालयात दाखल केलं.
- इतकी क्रूरता का येते?
- मुंबई सुरक्षित आहे, असा दावाही त्यांनी केला.
जलदगती न्यायालयात खटला चालवू – नवाब मलिक
- महिलेचा मृत्यू दुखद आहे.
- लवकरात लवकर चार्जशीट दाखल करू.
- जलदगती न्यायालयात खटला चालवू.
- नराधमांच्या मनात भीती निर्माण होईल अशी शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
नराधमाला फाशीच द्या – भाई जगताप
- एक आरोपी पकडला आहे.
- मी पोलिसांशी बोललो.
- निर्भया प्रकरणासारखीच ही घटना घडली आहे. मुंबई पोलिसांवर माझा विश्वास आहे.
- पोलिसांनी लगेच आरोपीला अटक केली.
- हा खटला जलदगती न्यायालयात चालवला पाहिजे. आरोपींना फाशीच झाली पाहिजे.
मुंबईच्या साकीनाका भागात अमानुष अत्याचार झालेल्या महिलेचा मृत्यू! संतापाचा भडका!!