मुक्तपीठ टीम
शिवसेना खासदार संजय राऊत यांची अलिबागमधील ८ भूखंड आणि दादरमधील फ्लॅट अशी मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. याबातमीनंतर लगेचच किरीट सोमय्यांनी पत्रकार घेतली. यात त्यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. तसेच या कारवाईसाठी किरीट सोमय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, ईडी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच या कारवाईनंतर आता ठाकरेंचे डर्टी डझन आणि ठाकरे परिवारावरही कारवाई होणार अशी पुढचा अजेंडाही त्यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केला आहे.
काय म्हणाले किरीट सोमय्या?
- संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीचे गैरव्यवहार समोर आले आहे.
- मागील काही महिन्यांपासून ईडीच्या कारवाईतून वाचण्यासाठी संजय राऊत यांची धडपड सुरू होती.
- मात्र, आता या प्रकरणात आणखी कारवाई होणार.
- पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील पैसे प्रवीण राऊत, संजय राऊत आणि वर्षा राऊत यांनी वापरले.
- संजय राऊत यांनी १० महिन्यांपूर्वी त्यांनी ईडी कार्यालयात जाऊन ५५ लाख रुपये परत केले होते.
- ईडीची काही दिवस कारवाई सुरू होती.
- आमच्याकडे देखील माहिती येत होती.
- गेले दोन महिने संजय राऊत यांची धडपड, धावपळ, बोगस पत्र व्यवहार, ईडीवर आरोप करणे, किरीट सोमय्या, निल
- आणि मेधा सोमय्या यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणे ही मानसिक अवस्था मी समजू शकत होतो
सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवरही निशाणा!
- आपल्यावर ईडीची कारवाई होणार असल्याचा अंदाज संजय राऊत यांना आला होता.
- त्यामुळेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात बैठक झाली.
- ईडी अधिकाऱ्यांचे तोंड बंद करता येईल असे महाराष्ट्र सरकारला वाटत होते.
- मात्र, आता आणखी कारवाई होणार.
- पोलिसांचा माफिया म्हणून वापर करून कारवाई टाळता येणार नाही.
- आपल्या माफिया सरदारांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांची धडपड सुरू आहे.
- पण आता ठाकरेंचे डर्टी डझन आणि ठाकरे परिवारावरही कारवाई होणार.
- संजय राऊत यांच्या प्रकरणाची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घ्यावी आणि कारवाई अशी मागणीदेखील
- सोमय्यांनी केली.
पत्राचाळ घोटाळा आहे तरी काय?
- मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगावमध्ये पत्रा चाळ आहे.
- त्या चाळींच्या पुनर्विकासाच्या मोठ्या प्रकल्पासाठी खूप स्पर्धा होती.
- त्यात एचडीआयएलही सहभागी होती.
- ही पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प १०३४ कोटींचा असल्याचे समजते.
- याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने यापूर्वीच अटक केली आहे.
- या प्रकरणी गेल्या आठवड्यात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.
- राऊतांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावरही यापूर्वी ईडीने छापेमारी केली होती.
- शिवाय संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून केलेल्या ५५ लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती.
- त्यानंतर संजय राऊत यांनी ते ५५ लाख परतही केले होते.
- या प्रकरणी त्यांची चौकशीही झाली.
- संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर आहेत.
- त्या व्यवहारातूनच हे प्रकरण थेट राऊतापर्यंत पोहचल्याचे समोर येत आहे.
हेही वाचा:
राज्याच्या राजकारणात ईडीकरण जोरात!
एकीकडे राऊतांच्या मागणीवर राज्याची ईडीविरोधी एसआयटी, दुसरीकडे राऊतांचा राहता फ्लॅट, जमिनीवर ईडीची जप्ती!
…तर सगळी संपत्ती भाजपाला दान करणार! – संजय राऊत