Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किरीट सोमय्यांना केंद्र सरकारची मंत्र्यांपेक्षाही जास्त सुरक्षा! लवकरच राज्यसभा खासदारकीही?

आघाडी सरकारशी सतत थेट आक्रमक सामना करणं फळतंय!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kirit somaiya

मुक्तपीठ टीम

भाजपचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या यांना थेट मोदी सरकारने सुरक्षा पुरवली आहे. मोदी सरकारने दिलेल्या सुरक्षा कवचमध्ये तब्बल तब्बल ४० सीआयएसएफ जवानांचा समावेश आहे. एखाद्या केंद्रीय मंत्र्यापेक्षाही सोमय्या यांना जास्त सुरक्षा पुरवण्यात आली आहे. किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेतल्याने सोमय्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. महाविकासआघाडी सरकारकडून धमक्या येत असल्याचं सांगत किरीट सोमय्यांनी केंद्राकडे सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे सोमय्यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. त्याचबरोबर लवकरच भाजपाने उमेदवारी नाकारल्याने हुकलेल्या लोकसभा खासदारकीचं परिमार्जन करण्यासाठी राज्यसभेची खासदारकी दिली जाण्याची चर्चा आहे.

 

कशी असते झेड सुरक्षा?

  • केंद्र सरकारकडून X, Y, Z, Z प्लस अशा प्रकारच्या सुरक्षा पुरवल्या जातात.
  • झेड दर्जाच्या सुरक्षा कवचामध्ये २२ जवान असतात.
  • यामध्ये ४ किंवा ५ NSG कमांडोंचा समावेश असतो.
  • एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचादेखील यात समावेश असतो.
  • ३ मिनिटांत कुठल्याही प्रसांगाला सामोरं जाण्यासाठी सीआयएसएफ जवान सज्ज असतात.
  • सोमय्यांच्या घराच्या बाजूलाच बॅरेक बनवून सुरक्षा रक्षकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे.

 

का पुरवली गेली सोमय्यांना झेड सुरक्षा?

  • काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांनी मविआ सरकारमधल्या ११ नेत्यांच्या कथित भ्रष्टाचारावरुन त्यांच्या नावाची यादीच जाहीर केली होती.
  • मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या कॅबिनेट मंत्र्यांनी घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.
  • यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यापासून ते मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचाही समावेश आहे.
  • तसंच परिवहनमंत्री अनिल परब यांच्यापासून ते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ११ जणांची नावं आहेत.
  • ठाकरे यांचं इलेव्हन सरकार आणि उद्धव ठाकरेंसह १२ जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार, असा इशारा त्यांनी दिलाय.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही त्यांनी दिवाळीपर्यंत बॅग घेऊन तयार राहण्यास सांगितले आहे.
  • शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्याविरोधातही त्यांनी ईडी कारवाईची मागणी केली.

Tags: Anil ParabBJPchief minister uddhav thackerayHousing Minister Jitendra AwhadKirit Somaiyaprime minister narendra modiShivsenaकिरीट सोमय्याकिशोरी पेडणेकरभावना गवळी
Previous Post

भाजपा खासदाराच्या सुनेचा सासरवर आरोप, न्यायासाठी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांकडे धाव!

Next Post

एनआयए आरोपपत्रात धक्कादायक आरोप…वाझे टोळीचा अंबानींकडून वसुलीचा दहशतवादी कट!

Next Post
sachin waze

एनआयए आरोपपत्रात धक्कादायक आरोप...वाझे टोळीचा अंबानींकडून वसुलीचा दहशतवादी कट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!