Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपा खासदाराच्या सुनेचा सासरवर आरोप, न्यायासाठी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांकडे धाव!

आता नेटकऱ्यांचा चित्रा वाघांना सवाल!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
NCP-BJP

मुक्तपीठ टीम

वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी आपल्याला कुटुंबाकडून मारहाण होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पूजा तडस यांनी रडत रडत व्हिडीओ शूट करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे मदत मागितली आहे. पूजा तडस यांचा हा व्हिडीओ असल्याचा दावा करत चाकणकर यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी पूजा यांच्या संरक्षणासाठी पोहोचल्या आहेत, अशी माहिती चाकणकर यांनी ट्वीटद्वारे दिली. दरम्यान, भाजपा खासदारांच्या सूनेनं न्यायासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकरांना साकडं घातल्यानं आता नेटकरी भाजपाच्या चित्रा वाघांना पिडत आहेत. आता चित्रा वाघ गेल्या तरी कुठे? स्वपक्षातील महिला अत्याचार दिसत नाही का, असा सवाल विचारला जात आहे.

पूजा तडस यांचा आरोप काय आहे?

  • पूजा तडस यांचा हा व्हिडीओ १२ सेकंदांचा आहे.
  • या व्हिडीओतली वाक्य….मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांच्याकडे मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे इथे, मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला. मी रिक्वेस्ट करते.

वर्धा भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुन यांना गेली अनेक दिवस हे तडस कुटूंब मारहाण करून अत्याचार करीत आहेत.पुजाचा आताच हा व्हिडीओ माझ्यापर्यंत आला, तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलिस सरंक्षणासाठी पोहचले आहेत. @NagpurPolice@maharashtra_hmo pic.twitter.com/PHAxlD2X3F

— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 8, 2021

 

काय म्हणाल्यात रुपाली चाकणकर?

  • मला आज सकाळी लवकरच पूजाचा फोन आला. फोनवर त्या रडत होत्या. माझ्याकडे मदतीची मागणी त्या करीत होत्या. त्यानंतर मला त्यांनी सविस्तर प्रकरण सांगितलं.
  • गेले अनेक दिवस रामदास तडस, त्यांचा मुलगा आणि तडस कुटुंबीय तिला मारहाण करत आहेत.
  • तिच्या जीवाला धोका असल्याचं तिने मला सांगितलं.
  • तसंच मला इथून घेऊन चला, अशी विनवणी तिने माझ्याकडे केली आहे.
  • राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यांच्या मदतीसाठी तत्काळ रवाना झाले आहेत. त्यांची सर्वोतोपरी मदत केली जाईल.
  • यासंदर्भात नागपूर पोलीस आयुक्तांशी माझं बोलणं सुरु आहे. सरकार आणि पोलिसांच्यावतीने देखील तत्काळ अॅक्शन घेतली जाईल.
  • झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे.
  • रामदास तडस आणि कुटुंबीयांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करा.
  • तडस यांना अटक करण्याची मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

खासदार रामदास तडस यांनी आरोप फेटाळले

  • माझा मुलगा पंकज आणि पूजाचं लग्न झालं. लग्नाच्या सहा महिन्यानंतर दोघेही वर्ध्याला राहू लागले.
  • काही काळानंतर पूजा माझ्या घरी राहायला आली.
  • दरम्यानच्या काळात पंकज आणि पूजाचं भांडण झालं होतं.
  • माझ्या वडिलांना न विचारता आपण लग्न केलंय. त्यावेळी आपलं असं ठरलं होतं की आपण वर्ध्याला रहायचं. मग आता तू त्यांना त्रास द्यायला त्यांच्याकडे का गेली, असं पंकजने पूजाला विचारलं.
  • हे भांडणं सुरु असताना मी वर्ध्याला होतो. मला घरुन फोन येताच मी तत्काळ पोलिसांना फोन लावून घटनेची माहिती दिली.
  • पोलिसांनी भांडणं सोडवली. मी देखील वर्ध्याहून घरी पोहोचलो. तोपर्यंत पंकज वर्ध्याला निघून गेला होता.
  • त्यानंतर पूजा माझ्याजवळ २ महिने राहिली. पण मी एकेदिवशी तिला सांगितलं की, अशी रुसून तू इथे किती दिवस राहणार आहे, तू पंकजकडे वर्ध्याला जायला हवं.
  • माझ्या बोलण्यानंतर ती वर्ध्याला न जाता तिच्या घरी गेली.
  • आता याच्यात माझा कवडीचाही दोष नाहीय.
  • मी तिला माझी सून मानतो… इथून पुढेही मानेन… त्या दोघांनीही आमच्या घरी यावं… राहावं… हीच माझी इच्छा आहे.

Tags: BJPBJP chitra waghnagpurNCPramdas tadasrupali chakankarरामदास तडसरुपाली चाकणकर
Previous Post

“दादासाहेब फाळके चित्रनगरीचा पुनर्विकास करण्यात येणार”

Next Post

किरीट सोमय्यांना केंद्र सरकारची मंत्र्यांपेक्षाही जास्त सुरक्षा! लवकरच राज्यसभा खासदारकीही?

Next Post
kirit somaiya

किरीट सोमय्यांना केंद्र सरकारची मंत्र्यांपेक्षाही जास्त सुरक्षा! लवकरच राज्यसभा खासदारकीही?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!