Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अनिल परब यांचे “तो मी नव्हेच” नाटक चालणार नाही – किरीट सोमय्या

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Anil Parab And Kirit somaiya

मुक्तपीठ टीम

“तो मी नव्हेच” या गाजलेल्या नाटकातील कै. प्रभाकर पणशीकर यांच्या भुमिकेनंतर अनिल परब यांचे आता दापोली रिसॉर्ट घोटाळ्या संबंधात तो मी नव्हेच अश्या प्रकारची भूमिका, नाटक हे एक अभिनय (अॅक्टिंग) आहे असे प्रतिपादन भाजपा किरीट सोमय्या यांनी केले आहे.

अनिल परब यांनी दापोली येथे बेकायदेशीर रिसॉर्ट बांधला ज्याचे बाजार मूल्य २५ कोटींहून अधिक आहे. प्रवर्तन निदेशालय (ईडी) यांनी घातलेल्या धाडी संबंधी “सांडपाणी” साठी ईडीवाले आले होते, असे विनोदी विधान भ्रष्टाचाराची गंगा असलेले अनिल परबच करू शकतात.

हा रिसॉर्ट अनिल परब यांचा आहे असा अर्ज २०१९ मध्ये अनिल परब यांनी शासनाकडे केला होता. त्याच्यावरील घरपट्टी, मालमत्ता कर २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षांचा अनिल परब यांनी भरला. हा रिसॉर्ट डिसेंबर २०२० मध्ये सदानंद कदम यांच्या नावावर अनिल परब यांनी ट्रान्सफर केला. किरीट सोमैया यांनी अनिल परब यांना प्रश्न केला आहे की,

१) १६,८०० स्के.फि. च्या रिसॉर्टचे घरपट्टी, मालमत्ता कर नोव्हेंबर २०१९ पासून अनिल परब भरत आहेत.

२) मालमत्ता कर अनिल परब भरतात परंतु मालमत्ता/प्रॉपर्टी स्वत:च्या नावाने इन्कमटॅक्स मध्ये व रिटर्न मध्ये दाखवले नाही. रिसॉर्ट बांधण्याचा करोडो रुपये खर्च अनिल परब यांनी आपल्या चोपडा/वाहिखात्यात मध्ये दाखवला नाही. अनिल परब यांनी बेनामी मालमत्ता उभी केली.

३) अनिल परब यांनी भ्रष्टाचार/गुन्हेगारीचा पैसा रिसॉर्ट बांधण्यासाठी वापरला.

४) २५ कोटींचा रिसॉर्ट केवळ १ कोटी रुपयात शेत जमीन म्हणून मार्च २०२१ मध्ये सदानंद कदम यांच्या नावावर ट्रान्सफर केला.

५) अनिल परब यांनी फोर्जरी, फसवणूक, चीटिंग केले आहे व त्यावर कारवाई करण्याचे आदेश, रिसॉर्ट तोडण्याचे आदेश महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारने दिले.

अनिल परब यांच्या विरोधात पर्यावरण मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (MCZMA), आयकर विभाग, प्रवर्तन निदेशालय (ED) चौकशी व कारवाई करित आहेत.

बेकायदेशीर रिसॉर्ट तुटणार व अनिल परब यांना शिक्षा होणार असा विश्वास किरीट सोमैया यांनी व्यक्त केला आहे.


Tags: Anil ParabEDKirit SomaiyaratnagiriSai Inn Resortअनिल परबईडीकिरीट सोमय्यातो मी नव्हेच
Previous Post

रिसॉर्ट सुरु नाही, तरीही सांडपाणी समुद्रात गेल्याची तक्रार…ईडी चौकशीनंतर अनिल परबांचा आक्षेप!

Next Post

चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंना आव्हान, “स्वीकाराच संभाजीराजेंचं आव्हान! कळू द्या खंजीर कुणी खुपसला!!”

Next Post
bjp vs shivsena

चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंना आव्हान, "स्वीकाराच संभाजीराजेंचं आव्हान! कळू द्या खंजीर कुणी खुपसला!!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!