Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रासह सात राज्यांत १४३ ‘खेलो इंडिया केंद्रे’ सुरु होणार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Khelo India

मुक्तपीठ टीम

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने देशातील सात राज्यांत १४३ समर्पित खेलो इंडिया केंद्रे सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. असून त्यासाठी १४ कोटी ३० लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी महाराष्ट्रातल्या ३० जिल्ह्यांत ३६ खेलो इंडिया केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. त्यासाठी ३ कोटी ६० रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
या प्रत्येक केंद्रात एका क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण दिले जाईल. महाराष्ट्रासह, मिझोराम, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश,अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर येथे ही केंद्रे स्थापन केली जाणार आहेत.

मिझोराममध्ये २, अरुणाचल प्रदेशमध्ये ५२, मध्यप्रदेशात ४, कर्नाटकात ३१, मणिपूरमध्ये १६ आणि गोव्यात २ खेलो इंडिया केंद्रे सुरु केली जाणार आहेत.

 

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने राज्य सरकारच्या भागीदारीतून खेलो इंडिया योजना सुरु केली. देशात तळागाळापर्यंतच्या खेळाडूंना उत्तम दर्जाचे क्रीडा साहित्य आणि सुविधा तसेच प्रशिक्षण मिळवून देण्याच्या हेतूने, ही केंद्रे सुरु करण्यात आली. या निर्णयाबद्दल क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांनी सांगितले की, २०२८ च्या ऑलिम्पिक्स मध्ये भारताला पहिल्या दहा देशांमध्ये स्थान मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, आपल्याला, अगदी लहान वयापासूनचा क्रीडाकौशल्ये असलेल्या मुलांची पारख करून, त्यांना प्रशिक्षण दिले जाणे आवश्यक आहे. या क्रीडा उपक्रमातून आपण योग्य त्या खेळातील निष्णात खेळाडूंची निवड करू शकू, असे रीजीजू म्हणाले.”

 

क्रीडा मंत्रालयाने, २०२० च्या जून महिन्यात देशभरात, येत्या चार वर्षात, अशी १००० पेक्षा अधिक क्रीडा केंद्रे सुरु करण्याची योजना बनवली आहे. आतापर्यंत २१७ क्रीडा केंद्रे स्थापन झाली असून, ईशान्य भारतातील राज्ये, जम्मू-कश्मीर, अंदमान निकोबार, लक्षद्वीप आणि लदाख या सर्व ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात, अशी प्रत्येकी दोन तरी केंद्रे तयार होण्याची अपेक्षा आहे.

 

संबधित राज्य सरकारांना आता या केंद्रांवर, जुन्या ॲथलीट प्रशिक्षकांची नेमणूक करावी लागेल. देशातील क्रीडा व्यवस्था अधिक मजबूत करत, तळागाळापर्यंतच्या विद्यार्थ्याना परवडतील, अशा प्रभावी क्रीडा सुविधा आणि प्रशिक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या दूरदृष्टीतून ही केंद्रे सुरु झाली आहेत.हे जुने खेळाडू नवोदित खेळाडूंचे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक असतील. या अंतर्गत दिलेल्या निधीतून, जुन्या खेळाडूंसह प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे मानधन दिले जाईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: khelo india centersकिरेन रीजीजूक्रीडा मंत्रालयखेलो इंडिया केंद्रेखेलो इंडिया योजना
Previous Post

प्लास्टिक कचरा द्या, जेवून जा! देशात आता अँटी पॉल्यूशन कॅफे!

Next Post

मायक्रोसॉफ्टचा नवा लॅपटॉप…भन्नाट फिचर्स… १९ तासांची बॅटरी!

Next Post
Microsoft

मायक्रोसॉफ्टचा नवा लॅपटॉप...भन्नाट फिचर्स... १९ तासांची बॅटरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!