Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्लास्टिक कचरा द्या, जेवून जा! देशात आता अँटी पॉल्यूशन कॅफे!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Garbage Cafe

मुक्तपीठ टीम

देशातील बर्‍याच शहरांमध्ये आता गार्बेज फूड कॅफे उघडले आहेत. येथे भोजन आणि नाश्त्यासाठी पैसे नाहीत तर प्लास्टिकचा कचरा घेतला जातो. देशातील अशा गार्बेज कॅफेमध्ये एक किलो प्लास्टिक कचऱ्याच्या मोबदल्यात भोजन दिले जाते.

 

छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये सुमारे २ वर्षांपूर्वी पहिला गार्बेज फूड कॅफे सुरू करण्यात आला होता. प्लास्टिक कचरा निवडल्यानंतर गरीब व बेघर लोकांना १ किलो प्लास्टिक कचर्‍याच्या जागी अन्न देण्यात येते. छत्तीसगडपासून सुरू झालेली ही मोहीम देशातील अनेक शहरांमध्ये पसरली आहे. दिल्लीतही असाच एक कॅफे सुरु झाला आहे. खरंतर हे अँटी पोल्यूशन कॅफेच आहेत.

कचऱ्यातील प्लास्टिकने बांधला रस्ता

राज्य सरकारने सुरुवातीला अंबिकापूरमधील गार्बेज फूड कॅफेसाठी, ५, लाखांचे बजेट जाहीर केले. प्लॅस्टिक कचरा निवडणारे आणि घर नसलेल्या बेघर लोकांना वास्तव्यासाठी प्रत्यक्ष जागा उपलब्ध करून देणे हा देखील एक उपक्रम आहे. अंबिकापुरात आधीच प्लास्टिकचा बनलेला रस्ता अस्तित्त्वात आहे. राज्यात असा पहिला रस्ता बांधण्यात आला असून या ठिकाणी, ८ लाख प्लास्टिक पिशव्या एकत्र केल्या आहेत. हा रस्ता, प्लास्टिक आणि सल्फेटचा बनलेला आहे.

 

त्यावर्षी छत्तीसगडमधील अंबिकापूरला इंदूरनंतर देशातील दुसरे सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवडले गेले होते. छत्तीसगडमधील अंबिकापूर रस्ते तयार करण्यासाठी प्लास्टिक कचर्‍याचा वापर करतात. अंबिकापुरात उघडलेले गार्बेज फूड कॅफे शहरातील मुख्य बसस्थानकात बांधण्यात आला होता. अंबिकापूरचे नगराध्यक्ष अजय तिर्की म्हणाले की, “या योजनेमुळे शहराला प्लास्टिक कचरामुक्त करण्यात तसेच रस्त्यांच्या बांधणीत प्लास्टिकचा वापर करण्यास बरीच मदत होईल.”

 

दिल्लीतही आता प्लास्टिक कॅफे

देशातील बर्‍याच शहरांमध्ये बेघर लोकांसाठी अन्न आणि राहण्याची व्यवस्था करण्यासाठी हा उपक्रम केला जात आहे. छत्तीसगडच्या या मोहिमेअंतर्गत महापालिकेने गरीब लोकांना राहण्याची व खाण्याची सोय केली होती. दिल्लीची दक्षिण महापालिकासुद्धा अशा प्रकारच्या योजनेवर काम करीत होते. येथे एक किलो प्लास्टिक कचरा दिल्यावर अन्न व न्याहारी दिली जाते. प्रयोग म्हणून कॅफे सुरुवातीला एक-दोन ठिकाणी उघडण्यात आली.

 

भारतात शहरांच्या स्वच्छतेच्या रँकिंग सुरू झाल्यापासून देशात असे वेगळे उपक्रम वाढले आहेत. देशातील बर्‍याच शहरांमध्ये स्वच्छतेसाठी प्लास्टिक कचरा संकलनाचा कल वाढत आहे. देशातील बर्‍याच शहरांमध्ये प्लास्टिकवर बंदी घातली गेली आहे, परंतु तरीही लोक प्लास्टिक वापरत आहेत. प्लास्टिक कॅफे योजना शहरांना प्लास्टिकमुक्त करण्यात मदत करते. प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी अशा मोहिमेद्वारे देशातील अनेक शहरांमध्ये स्वच्छता क्रमवारीत उच्च स्थान आहे. यासह देशातील अनेक शहरांमध्ये कचरा व्यवस्थापनासाठी नवीन तंत्रज्ञानही अवलंबले जात आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Free FoodGarbage CafePlastic Wasteगार्बेज फूड कॅफेप्लास्टिक कॅफे
Previous Post

अकरावीच्या विद्यार्थीनींचे वारली चित्रकलेतून लसीकरणासाठी प्रबोधन

Next Post

महाराष्ट्रासह सात राज्यांत १४३ ‘खेलो इंडिया केंद्रे’ सुरु होणार

Next Post
Khelo India

महाराष्ट्रासह सात राज्यांत १४३ ‘खेलो इंडिया केंद्रे’ सुरु होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!