Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केदारनाथ धामचे दरवाजे उघडले, पंतप्रधान मोदींनी केली पहिली पूजा

कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत 'चार धाम' यात्रा होणार नाही

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kedarnath

मुक्तपीठ टीम

 

हिंदूचं श्रद्धास्थान आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथचे दरवाजे आज उघडले गेले आहेत. नेहमीच्या प्रथेप्रमाणे हिवाळ्यात केदारनाथचे दरवाजे बंद करण्यात आले होते. आज सोमवारी पहाटे ५ वाजच्या सुमारास केदारनाथांची परंपरेनुसार पूजा करण्यात आली. पहिली पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. यावेळी कोणत्याही भाविकांना दर्शनाची परवानगी नव्हती.

 

दरवाजे उघडण्यापूर्वी आदल्या दिवशी रविवारी मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी सर्वसामान्यांना कोरोनाची परिस्थिती पाहता, घरीच राहून पूजा करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी सांगितले की या काळात केदारनाथचे रावल (मुख्य पुजारी) श्री भीमाशंकर लिंगम जी यांच्या नेतृत्वात मर्यादित संख्येने पुजारी मंदिरात नियमितपणे बाबा केदारनाथची उपासना करतील. सध्या भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देता येणार नाही.

 

चार धाम यात्रा होणार नाही

• या वेळी चार धाम यात्रा पुढे ढकलण्यात आली असल्याचे राज्य सरकारने आधीच जाहीर केले आहे.
• केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यापूर्वी यमुनोत्री १४ मे आणि गंगोत्री १५ मे रोजी उघडण्यात आले आहेत.
• तिथेही दर्शनांवर निर्बंधांची व्यवस्था राबवण्यात आली. भाविकांच्या प्रवेशांवर बंदी होती.
• दरवर्षी हिवाळ्यानंतर चार धाम म्हणून ओळखल्या जाणार्‍या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडले जातात.
• गेल्यावर्षी कोरोनामुळे चार धाम यात्रा उशिरा सुरू झाली होती.

• यावेळी त्या यात्रा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
• मर्यादित संख्येने पुजारी मंदिरात नियमित पूजा करणार आहेत.
• कोरोनावरून जारी केलेल्या एसओपीमध्येही सरकारने याचा उल्लेख केला आहे.

 

मंदिराचे दरवाजे उघडण्याच्या वेळी केदारनाथ मंदिराला फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच बद्रीनाथ धामचे दरवाजेही १८ मे रोजी उघडले जातील, परंतु भाविकांना येण्यास परवानगी दिली जाणार नाही.


Tags: kedarnathprime minister narendra modiकेदारनाथ मंदिरपंतप्रधान नरेंद्र मोदीबद्रीनाथ धाम
Previous Post

तौत्के चक्रीवादळाचा प्रवास गुजरातच्या दिशेने, मुसळधार पावसाचा इशारा

Next Post

कोरोना लस जीएसटी कक्षेतून हटवण्यावर चर्चेची शक्यता

Next Post
gst

कोरोना लस जीएसटी कक्षेतून हटवण्यावर चर्चेची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!