Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तौत्के चक्रीवादळाचा प्रवास गुजरातच्या दिशेने, मुसळधार पावसाचा इशारा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
tautktae cyclone

मुक्तपीठ टीम

 

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळाने अतिरौद्र रुप धारण केले आहे. चक्रीवादळ वेगवान असून ते गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेने निघाले आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ठिकाणी याचा यासह काही ठिकाणी जाणवला आहे. अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यांसह घरांची आणि झाडांची पडझड पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. रविवारी रात्रीपासून मुंबईसह ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा यासह इतर ठिकाणी पाऊस पडत आहे. तर पुढील काही तासांत राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईतील परिस्थिती

  • तौत्के चक्रीवादळ हे सध्या मुंबईपासून सुमारे १५० किमी अंतरावर आहे.
  • मुंबईला हे वादळ थेट धडकणार नसलं तरीही त्याचे थेट परिणाम मात्र शहरात दिसून येण्यास सुरुवात झाली आहे.
  • मुंबईत मोठ्या प्रमाणावर सोसाट्याचे वारे आणि मुसळधार ते मध्यम स्वरुपाच्या पावसालाही सुरुवात झाली आहे.
  • मुंबईतील दादर, वरळी, लोअर परेल, माटुंगा, माहिमसह पश्चिम उपनगरात सर्वत्र जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे.
  • मुंबईतील वरळी सी फेस, शिवाजी पार्क, मरीन ड्राईव्ह या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर उंच लाटा उसळताना पाहायला मिळत आहे.
  • पुढील चार – पाच तास मुंबईत अशीच परिस्थिती कायम राहणार.
  • याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघरसह इतर आजूबाजूच्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • मुंबईत आतापर्यंत ३४ ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे.
  • यात मुंबई शहर ११, पश्चिम उपनगर १७, पूर्व उपनगरात ६ ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे.

 

ठाणे, नवी मुंबईत वीज खंडित

  • तौत्के चक्रीवादळाचा फटका संपूर्ण महाराष्ट्राला बसला आहे.
  • रविवार रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे.
  • ठाणे, नवी मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे.
  • अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे.
  • त्यामुळे ठाणे, नवी मुंबईसह इतर ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे.

 

रत्नागिरी, सिंधदुर्गात वादळाचा फटका

  • रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याला वादळाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
  • रत्नागिरीतील १०४ गावांमधील ८०० ते १ हजार घरांची पडझड झाली आहे.
  • रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील बहुतांश गावात वीज पुरवठा खंडित झाला आहे.
  • रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरून आतापर्यंत ६ हजार ५४० नागरिकांनी सुरक्षित जागी स्थलांतरीत करण्यात आले आहे.
  • रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदी करण्यात आले आहे.

 

पुणे, कोल्हापूरात सोसाट्याच्या वाऱ्याह पाऊस

  • पुणे, कोल्हापूर, अमरावती, वाशिम या जिल्ह्यातही सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला.
  • पुण्यात वादळी वारा आणि पावसामुळं झाडं कोसळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
  • तर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात एकीकडे जोरदार वारा आणि दुसरीकडे थंडीमुळे थंडीने हा परिसर गारठून गेला.

 

लसीकरण केंद्र बंद

  • तौक्ते चक्रीवादळाच्या पाश्वभूमीवर मुंबई, पालघरमधील कोरोना लसीकरण केंद्रं बंद ठेवण्यात आले आहेत.
  • पुढील दोन दिवस ही लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत.
  • मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णालय, ऑक्सिजन, व्हेंटिलरसह, आयसीयूची सुविधा करण्यात आली आहे.

Tags: Kolhapurmumbaipunerain warningsanglitautktae cyclonethanevaccinationअरबी समुद्रतौक्ते चक्रीवादळ
Previous Post

डीआरडीओचे कोरोनाविरोधी नवे औषध लाँच! आठवडाभरात रुग्णांवर चांगल्या परिमाणांचा दावा!!

Next Post

केदारनाथ धामचे दरवाजे उघडले, पंतप्रधान मोदींनी केली पहिली पूजा

Next Post
kedarnath

केदारनाथ धामचे दरवाजे उघडले, पंतप्रधान मोदींनी केली पहिली पूजा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!