Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केदारनाथ मंदिराचे दरवाजे ६ मे रोजी, तर बद्रीनाथ मंदिराचे ८ मे रोजी उघडणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, धर्म
0
Kedarnath-Badrinath Dham

मुक्तपीठ टीम

उत्तराखंडमधील केदारनाथ आणि बद्रीनाथ धाम ही मंदिर म्हणजे हिंदू श्रद्धाळूंची भक्तिभावानं भेट देण्याची पवित्र स्थानं. हिवाळ्यात हिमवृष्टीमुळे त्या दोन मंदिरांमधील दर्शन बंद असते. हिवाळ्यानंतर मंदिराचे द्वार उघडण्याचा मुहुर्त मुख्य पुजारी ठरवतात. आता केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, महाशिवरात्रीनिमित्त ओंकारेश्वर मंदिरात आयोजित धार्मिक कार्यक्रमात मुख्य पुजारी रावल भीमाशंकर यांच्या उपस्थितीत पंचांग मोजल्यानंतर केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची वेळ ठरवण्यात आली. सहा मे रोजी वृश्चिक राशीत सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी बाबा केदारनाथ धामचे दरवाजे उघडले जातील असे ठरले. त्याचबरोबर बद्रीनाथ धामचे दरवाजे ८ मे रोजी उघडण्यात येणार आहेत.

 

केदारनाथ-बद्रीनाथ धामचे दरवाजे लवकरच उघडणार, उत्सवाचे नियोजन आणि जय्यत तयारी सुरू

  • मुहूर्त काढण्यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय, केदारनाथचे माजी आमदार मनोज रावत, उखीमठचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र वर्मा यांच्यासह धार्मिक आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
  • हिवाळ्यात प्रचंड बर्फवृष्टी आणि कडाक्याच्या थंडीमुळे केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारही धामांचे दरवाजे भाविकांसाठी बंद करण्यात आले होते, जे आता एप्रिल-मेमध्ये पुन्हा उघडले जातात.
  • बाराव्या ज्योतिर्लिंगातील अग्रगण्य भगवान केदारनाथचे दरवाजे उघडण्यासोबतच उखीमठ ते कैलास या पंचमुखी जंगम देवता उत्सव डोलीच्या प्रस्थानाची तारीखही निश्चित करण्यात आली होती.
  • बाबा केदारनाथची डोली हिवाळी आसनस्थान असलेल्या ओंकारेश्वर मंदिरातून २ मे रोजी धामकडे प्रस्थान करेल.
  • त्याआधी १ मे रोजी भगवान भैरवनाथाची पूजा केली जाणार असून २ मे रोजी बाबा केदार यांची डोली सभामंडपात आणल्यानंतर ही डोली धामकडे रवाना होईल.
  • डोली गुप्तकाशीमध्ये पहिला रात्रीचा मुक्काम करणार आहे. ३ मे रोजी रामपूरमध्ये रात्रभर मुक्काम केल्यानंतर डोली गौरीकुंडला रवाना होईल.
  • ५ मे रोजी बाबा केदार यांचा पंचमुखी उत्सव डोली धामला रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ मे रोजी बाबा केदारनाथचे दरवाजे उघडले जातील.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Badrinath Templegood newsHindu holy placesKedarnath TempleKedarnath-Badrinath Dham gates to openmuktpeethUttarakhandउत्तराखंडकेदारनाथ मंदिरकेदारनाथ-बद्रीनाथ धाम दरवाजे उघडणारचांगली बातमीबद्रीनाथ मंदिरमुक्तपीठहिंदू पवित्र स्थान
Previous Post

डॉक्टरांचा सेवाभाव! पुण्यातील आलेपाक विकणाऱ्यांच्या मुलाची गंभीर समस्येतून मुक्तता!

Next Post

काश्मिरच्या स्वर्गात श्रीनगर, पहलगाम, गुलमर्ग आणि दाल सरोवरापेक्षाही सुंदर काही ठिकाणं

Next Post
Jammu and Kashmir

काश्मिरच्या स्वर्गात श्रीनगर, पहलगाम, गुलमर्ग आणि दाल सरोवरापेक्षाही सुंदर काही ठिकाणं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!