-
अजिंक्य घोंगडे
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात राहणाऱ्या कामेश्वर वाघमारे या मुलाची निवड प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी झाली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या कामेश्वरने नदीत वाहून जाणाऱ्या दोन मुलाना बाहेर काढलं होतं.
शौर्य पुरस्कारासाठी कमेश्वरची निवड होण्याचे कारण म्हणजे त्याने आपला जीव धोक्यात टाकून अन्य दोन मुलांचे प्राण वाचवले आहेत.
प्रजासत्ताकदिनी दिल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री बाल पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. महाराष्ट्रातील एकूण पाच मुलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या मुलाला त्याने दाखवलेल्या शौर्यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे.
राष्ट्रीय शौर्य पुरस्काराचे स्वरुप
- राष्ट्रीय शौर्य पुरस्कार हा भारतातील १६ वर्षाखालील शूर बालकांना दिला जातो
- कठीण प्रसंगात आपले अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या बालकांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते
- पदक, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असते.
पाहा व्हिडीओ :