Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी कोणार्क नव तेजानं झळाळणार, विकासासाठी सरकारची रुपरेखा

January 27, 2021
in सरकारी बातम्या
0
Konark surya mandir-1

मुक्तपीठ टीम

 

श्रीक्षेत्र पुरीला जागतिक ऐतिहासिक शहर म्हणून विकसित करण्यासाठी ओरिसा सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, सरकारने कोणार्क क्षेत्राच्या विकासासाठी एक रोडमॅपही तयार केला आहे. कोणार्क परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्यासाठी योजना तयार केली गेली आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे कोणार्क सूर्य मंदिराची प्रतिष्ठा, पर्यटकांसाठी नवीन अनुभूती, स्थानिक व्यावसायिकांचा आर्थिक विकास आणि कोणार्कसह संपूर्ण जिल्हा आणि राज्यात पर्यटनाचा विकास हा आहे.

 

१९८४ मध्ये, युनेस्कोने कोणार्कला जागतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे. जगप्रसिद्ध कोणार्क सूर्यमंदिराच्या सुरक्षेसह त्याची देखभालीचा उद्देश आहे. अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकार त्यांच्या ५ टी कार्यक्रमांतर्गत हा प्रकल्प सुरू करणार आहे.

 

या प्रकल्पांतर्गत एंट्री पॉईंटवर पर्यटकांच्या स्वागतासाठी कोणार्क एन्ट्री प्लाझा बांधला जाणार आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी मल्टी मॉडेल हब बांधण्यात येणार आहे. त्याच प्रकारे कोणार्क मुक्ताकाश थिएटर अधिक आकर्षक बनविण्यात येणार आहे. परिसरातील सुशोभिकरणात पादचाऱ्यांसाठी एक खास रस्ता बनवला जाईल. कोणार्क योजनेमुळे स्थानिक लोकांच्या विकासासह वारसा जपला जाईल आणि जगभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र बनेल अशी माहिती उच्चस्तरीय समितीने मुख्यमंत्र्यांना दिली.

 

कोणार्कमध्ये विकासाचा नवा सूर्योदय

  • भुवनेश्वर ते कोणार्क पर्यंत बनवण्यात येणार पॉईंट्स
  • अशा परिस्थितीत, कोणार्क मंदिराच्या सभोवतालच्या क्षेत्राचा विकास करण्याबरोबरच या विकासातील प्राचीन वारसा समायोजित करण्यावर भर देण्यात आला आहे.
  • साडेतीन किलोमीटरचा बाहेरील रिंग रोडला सहा लेन बनवल्या जातील
  • मंदिराकडे जाणारा सर्व मार्ग विकसित केला जाईल
  • प्रवाशांना आणण्यासाठी भुवनेश्वर ते कोणार्क पर्यंत पॉईंट बनविण्यात येतील. मंदिरासमोरील ३० एकर जमीन पूर्णपणे मोकळी ठेवण्याबरोबरच लँडस्केपिंग देखील केले जाईल

 

एक वेगळी बाब म्हणजे, सरकारच्या या विकास योजनेबद्दल स्थानिकांचे मतदानही घेण्यात येणार आहे. त्यानंतर विकासकार्याचा अंतिम निर्णय़ घेतला जाईल.

 

 


Tags: konarkkonark temple developmentsurya mandirकोणार्ककोणार्क परिसर विकाससूर्यमंदिर
Previous Post

#चांगलीबातमी पंतप्रधान बाल शौर्य पुरस्कारासाठी नांदेडच्या कामेश्वर वाघमारेची निवड

Next Post

#चांगलीबातमी ब्रिटन, ऑस्ट्रेलियासह १२ देशांमध्ये कुशल भारतीय कामगारांना रोजगार

Next Post
Skilled Labor -1

#चांगलीबातमी ब्रिटन, ऑस्ट्रेलियासह १२ देशांमध्ये कुशल भारतीय कामगारांना रोजगार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!