Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘हर हर महादेव’ प्रेक्षक मारहाण प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांना अटक

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Jitendra Awha arrested in 'Har Har Mahadev' audience beating case

मुक्तपीठ टीम

आक्षेपार्ह प्रसंग असलेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध करणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना भोवलं आहे. ठाण्यातील चित्रपटगृहात त्या चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडताना काही प्रेक्षकांना मारहाण, धक्काबुक्की केल्याचा आरोप ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाचे विद्रुपीकरण करण्यात आला आहे. त्यामुळे शिवप्रेमींकडून राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्यास भाग पाडले. त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावले. त्यावेळी एका प्रेक्षकाला मारहाणही करण्यात आली. त्याच प्रकरणामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासहीत माजी खासदार आनंद परांजपे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

भाजपाकडून अटकेचे स्वागत!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी स्वागत केलं आहे. अत्यंत योग्य आणि स्वागतार्ह कारवाई आहे, असं त्यांनी मत व्यक्त केलं आहे. राज्यात कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही, कायद्याप्रमाणे वागावं लागेल हे आव्हाडांनी लक्षात ठेवावं अशी सल्लावजा सूचनाही त्यांनी केली.

सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूचे नाही!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आव्हाडांच्या अटकेनंतर संताप व्यक्त केला आहे. हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने आहे, असे दिसत नाही. सरकारने सिनेमा तयार करताना यामध्ये इतिहासाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांना जाब विचारण्याऐवजी निषेध करणाऱ्यांनाच अटक केली आहे. सगळीकडे लोकांच्या मनात या चित्रपटातील इतिहासाच्या विद्रुपीकरणाबद्दल संताप आहे. जितेंद्र आव्हाडांनी खरंतर गुन्हा केलेलाच नाही. तरीही सरकारने चिडून आता जितेंद्र आव्हाडांवर राग काढायला सुरुवात केलेली आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर केला आहे.


Tags: beating casegood newsHar Har MahadevMLA Jitendra AwadmuktpeethNCPआमदार जितेंद्र आव्हाडचांगली बातमीमारहाण प्रकरणमुक्तपीठराष्ट्रवादी काँग्रेसहर हर महादेव
Previous Post

भारत जोडो यात्रेकरूंसाठी अंथरला फुलांचा सडा

Next Post

भारताचे पहिले सार्वभौम हरित बॉन्डस्! हरित प्रकल्पांमध्ये जागतिक आणि देशांतर्गत गुंतवणुकीची संधी!!

Next Post
Sovereign Green Bonds

भारताचे पहिले सार्वभौम हरित बॉन्डस्! हरित प्रकल्पांमध्ये जागतिक आणि देशांतर्गत गुंतवणुकीची संधी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!