Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत जोडो यात्रेकरूंसाठी अंथरला फुलांचा सडा

नांदेड जिल्ह्यात लाभला अभूतपूर्व प्रतिसाद

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Bharat Jodo

मुक्तपीठ टीम

राहुलजी गांधी यांचे स्वागत, दोन क्विंटल फुलांचा सडा कित्येक फूट शिंपून सेनी (ता. अर्दापूर) येथे ग्रामस्थांनी राहुल गांधी यांचे असे खास स्वागत केले. त्यांच्या या अनोख्या स्वागताने मार्गावरून निघालेले हजारो यात्रेकरूही सुखावून गेले. नांदेड जिल्ह्यातील अभूतपूर्व गर्दी, लोकांचा उत्साह आणि सहभागानंतर सायंकाळी यात्रेने हिंगोली जिल्ह्यात प्रवेश केला.

‘देशाचे संविधान वाचवण्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी, आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी राहुल गांधी कन्याकुमारी काश्मीर पर्यंत पदयात्रेस निघाले आहेत. त्यांच्याबद्दल सन्मान व्यक्त करण्यासाठी आम्ही ही फुले अंथरली आहेत. ही फुले नाहीत तर त्या आमच्या भावना आहेत, असे सेनीचे रहिवासी शंकर राजाराम शिंदे यांनी सांगितले. त्याच्याच पुढे काही ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्याच्या आकारातील फुलांच्या आकर्षक प्रतिकृतीद्वारे राहुलजींचे स्वागत केले.

सकाळच्या सत्रात प्रचंड गर्दी उसळलेल्या नांदेड – हिंगोली मार्गावर आजूबाजूच्या ५० किलोमीटर अंतरावरील खेड्यापाड्यातुन आलेले अनेक ग्रामस्थ जागोजागी रस्त्याच्या कडेला समूहाने उभे होते. तसेच वेगवेगळे प्रश्न घेऊन लोक यात्रा मार्गावर राहुलजी सोबत चालण्यासाठी आले होते.

‘वन रँक वन पेन्शन’ची मागणी घेऊन मुदखेड येथील २२ माजी सैनिक रस्त्याच्या कडेला जोरजोरात घोषणा देत उभे होते. “आमची ही मागणी केवळ काँग्रेसच पूर्ण करेल,” असा आमचा विश्वास आहे. म्हणूनच आम्ही राहुलजींना पाठिंबा द्यायला आलो आहोत, असे माजी सैनिक साहेबराव होने यांनी सांगितले.

नऊ वर्षाचा नागेश गजानन नर्डीले मोरपिसांचा गुच्छ घेऊन बाबांसोबत स्वागतासाठी आला होता. तर हिमायतनगरहुन असंख्य महिलाचा समूह दाखल झाला होता.


Tags: Bharat Jodo PilgrimCongressCongress leader Rahul Gandhigood newsMaharashtramuktpeethNanded DistrictUnprecedented Responseअभूतपूर्व प्रतिसादकाँग्रेस नेते राहुल गांधीकॉंग्रेसघडलं-बिघडलंचांगली बातमीनांदेड जिल्हाभारत जोडो यात्रेकरूमहाराष्ट्रमुक्तपीठ
Previous Post

“सांस्कृतिक धोरण समिती” कार्याध्यक्षपदी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती  

Next Post

‘हर हर महादेव’ प्रेक्षक मारहाण प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांना अटक

Next Post
Jitendra Awha arrested in 'Har Har Mahadev' audience beating case

‘हर हर महादेव’ प्रेक्षक मारहाण प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!